बिलखेडा येथे शेतकर्‍याची गळफास घेवून आत्महत्या

बिलखेडा येथे शेतकर्‍याची गळफास घेवून आत्महत्या

आत्महत्येचे कारण अस्पष्ट ; एमआयडीसी पोलिसांकडून पंचनामा

जळगाव - jalgaon

तालुक्यातील बिलखेडा येथे माधवराव श्रावण कुंभार वय ६२ यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना मंगळवार रोजी दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास घटना घडली. त्यांच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही.

माधवराव कुुंभार हे शेती करुन उदरनिर्वाह भागवित होते. मंगळवारी घरीच एकटे होते. तर पत्नी शेतात गेलेली होती व मुले कामावर गेले होते. यादरम्यान दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास माधवराव कुंभार यांनी राहत्या घरात गळफास घेतला. गावातील नागरिकांमुळे घटना समोर आली. घटनेची माहिती मिळाल्यावर पोलीस पाटील मुकूंदा पाटील यांनी घटनास्थळ गाठले. एमआयडीसी पोलिसांनाही माहिती कळविण्यात आली. त्यानुसार सहाय्यक फौजदार राजेंद्र उगले, पोलीस कॉन्स्टेबल स्वप्निल पाटील, हेमंत पाटील यांनी घटनास्थळ गाठले. पंचनामा करुन मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. मयत माधवराव कुंभार यांच्या पश्‍चात पत्नी कमलबाई , दोन मुले मुकूंदा व दुर्गेश तसेच मुलगी जयश्री असा परिवार आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरु होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com