मनपा आयुक्तांसह मुख्य लेखाधिकार्‍यांना निरोप

11 कर्मचारी निवृत्त; प्रशासनासह पदाधिकार्‍यांकडून सत्कार
मनपा आयुक्तांसह मुख्य लेखाधिकार्‍यांना निरोप

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

जळगाव महानगरपालिकेचे आयुक्त सतीष कुलकर्णी (Municipal Commissioner Satish Kulkarni) यांच्यासह 11 कर्मचारी निवृत्त (Retired) झालेत. त्या निमित्ताने त्यांचा सेवानिवृत्तीपर तर मुख्य लेखाधिकारी (Chief Accounts Officer) कपिल पवार यांची नागपूर येथे बदली झाल्याने त्यांचाही महापौर जयश्री महाजन यांच्याहस्ते सत्कार (Hospitality) करण्यात आला.

मनपाच्या दुसर्‍या मजल्यावरील आयोजित कार्यक्रमात व्यासपीठावर महापौर जयश्री महाजन,(Mayor Jayashree Mahajan) विरोधी पक्षनेते सुनील महाजन, ज्येष्ठ नगरसेवक नितीन लढ्ढा, कैलास सोनवणे, आयुक्त सतीष कुलकर्णी, अप्पर आयुक्त डॉ.विद्या गायकवाड, मुख्य लेखाधिकारी कपिल पवार, उपायुक्त प्रशांत पाटील, श्याम गोसावी, सहाय्यक आयुक्त अभिजीत बाविस्कर उपस्थित होते.

प्रारंभी निवृत्त (Retired) झाल्याबद्दल आयुक्त सतीष कुलकर्णी यांचा तर पदोन्नती (Promotion) झाल्याबद्दल कपिल पवार यांचा महापौरांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी नितीन लढ्ढा, महापौर जयश्री महाजन यांनी मनोगत व्यक्त करतांना आयुक्त कुलकर्णी यांच्या दोन वर्षातील प्रशासकीय सेवेतील कार्याची प्रशंसा केली.

आयुक्त सतीष कुलकर्णी (Municipal Commissioner Satish Kulkarni) यांनी मनोगत व्यक्त करतांना जळगावकर आणि पदाधिकार्‍यांकडून सहकार्य लाभल्याचा उल्लेख केला. तसेच विठ्ठलाच्या पंढरपुरातून प्रशासकीय सेवेला सुरुवात करुन बहिणाबाई आणि मुक्ताईंच्या गावात निवृत्त झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

कपिल पवार (Chief Accounts Officer) यांनीही जळगाव महापालिकेचा अनुभव चांगला राहिल असून, मी, पुन्हा येईल असे म्हणताच हशा पिकला. सुत्रसंचालन नगरसचिव सुनील गोराणे यांनी केले.

Related Stories

No stories found.