बाप्पाला आज निरोप

शहरातील विविध भागात पोलिसांचे पथसंचलन
बाप्पाला आज निरोप

जळगाव । प्रतिनिधी Jalgaon

गणरायाला आज अनंत चतुर्दशीनिमित्त निरोप देण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध भागात पोलिसांनी सोमवारी पथसंचलन केले. सकाळी शनिपेठमधील भिलपुरा पोलीस चौकीपासून पथसंचलनास सुरुवात केली.

काट्या फाइल, रथचौक, कोळीपेठ, बालाजी मंदिर, इच्छादेवी चौक, तांबापूर, मेहरुण ते एमआयडीसीमध्ये झाले. डीवायएसपी डॉ.निलाभ रोहन यांच्या नेतृत्त्वाखाली हे पथसंचलन झाले. या पथसंचलनात शहरातील सर्व पोलीस ठाणे, शहर वाहतूक नियंत्रण शाखा, मुख्यालयातील कर्मचारी, होमगार्ड, तसेच शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरुण निकम, शनिपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक विठ्ठल ससे, रामानंदनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल बडगुजर, जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक अकबर पटेल, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक विनायक लोकरे आदींचा सहभाग होता.

मूर्ती संकलन केंद्र, वाहतूक व्यवस्था

मनपा शाळा क्र. 1 शिवाजीनगर

मनपा शाळा क्र. 1 शिवाजीनगर येथून श्री मोटर्स, ममुराबाद रस्ता, रेल्वे पुलाखालून, शनि मंदिर, भिलपुरा चौक, टॉवर चौक, चित्रा चौक, शिवाजी पुतळा, स्वातंत्र्य चौक, आकाशवाणी चौक, काव्यरत्नावली चौक, डी मार्ट, सेंट टेरेसा शाळेजवळून मेहरुण तलाव. वाहन चालक मनोहर सोनवणे.

साने गुरूजी वाचनालय प्रभाग 5

वाचनालय येथून नगरसेवक विष्णू भंगाळे यांचे घर, पोष्ट ऑफिस रोड, डॉ. विलास भोळे दवाखाना , स्वातंत्र्य चौक, आकाशवाणी चौक (डीएसपी), काव्यरत्नावली चौक, डी मार्ट, सेंट टेरेसा शाळेजवळून मेहरुण तलाव. वाहन चालक दिलीप राणे.

व.वा.वाचनालय नवीपेठ

व.वा.वाचनालय येथून नवी पेठ, नेहरु चौक, शिवाजी पुतळा, स्वातंत्र्य चौक, आकाशवाणी चौक, काव्यरत्नावली चौक (डीएसपी), डी मार्ट, सेंट टेरेसा शाळेजवळून मेहरुण तलाव. वाहन चालक चंद्रकांत मानकुंबरे.

गुजराथी मंगल कार्यालय प्रभाग 7

गुजराथी मंगल कार्यालय येथून रिंगरोड, डॉ. जे. बी. राजपूत दवाखाना, आकाशवाणी चौक, काव्यरत्नावली चौक (डीएसपी), डी मार्ट, सेंट टेरेसा शाळेजवळून मेहरुण तलाव. वाहन चालक मोहन जाधव.

शकुंतला, विद्युत कॉलनी

शकुंतला तंत्रनिकेतन ते हायवे क्र. 6, आकाशवाणी चौक, काव्यरत्नावली चौक (डीएसपी), डी मार्ट, सेंट टेरेसा शाळेजवळून मेहरुण तलाव. वाहन चालक प्रकाश भोई

निमखेडी रोड, प्रभाग 8

कांताई नेत्रालय ते उत्तुंग चौक, गुजराल पेट्रोल पंप, हायवे क्र. 6, आकाशवाणी चौक, काव्यरत्नावली चौक (डीएसपी), डी मार्ट, सेंट टेरेसा शाळेजवळून मेहरुण तलाव. वाहन चालक रमेश भोई, विकास कोळी.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com