भक्तीमय वातावरणात बाप्पाला निरोप

शाळांमध्ये श्रीगणरायाची आरती; ऑनलाईन पध्दतीने विद्यार्थ्यांनी घेतले दर्शन
भक्तीमय वातावरणात बाप्पाला निरोप

जळगाव jalgaon

शहरातील विविध शाळांमध्ये (Schools) श्री गणरायाची स्थापना गणेश चतुर्थीला करण्यात आली होती. 10 दिवस साधेपणाने मान्यवरांच्याहस्ते गणरायाची आरती करण्यात आली. ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांंनी दर्शन घेऊन आनंद द्विगुणित केला. तसेच शेवटच्या दिवशी शहरातील शाळांमध्ये शिक्षक-शिक्षिकांसह विद्यार्थ्यांनी अनंतचतुर्थीला (Anantachaturthi) गणपती बाप्पा मोरया...पुढच्या वर्षी लवकर या...च्या (Ganpati Bappa Morya ... come early next year)जयघोषात रविवारी गणपती बाप्पाला भावपूर्ण (Emotional) व भक्तीमय(devotional)वातावरणात निरोप (good bye) देण्यात आला.

काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल

विवेकानंद प्रतिष्ठान संचलित काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलमध्ये गणपती बाप्पाला भक्तीमय वातावरणात निरोप देण्यात आला. बाप्पाला निरोप देण्याआधी शाळेचे प्राचार्य अमितसिंह भाटिया, समन्वयिका संगीता तळेले, स्वाती अहिरराव, अनघा सागडे यांच्याहस्ते बाप्पाची आरती करण्यात आली. या 10 दिवसांमध्ये शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी गणपती स्तोत्र पठण, सेल्फी विथ बाप्पा तसेच रांगोळी, कथाकथन, चिन्हांकित गणेश प्रतिमा तयार करणे, पेपर कोलाज इत्यादी उपक्रम विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन घेण्यात आले होते.

तसेच सर्व शिक्षकांनी गणपती स्तोत्र पठण व गणपती अथर्वशीर्षाचे 5 आवर्तने केली. तसेच रोज प्रत्येकी एक वर्ग झूम अ‍ॅपला जॉईन करून विद्यार्थी बाप्पांच्या आरतीमध्ये सहभागी होत होते. शाळेमध्ये 10 दिवस अतिशय आनंदी व उत्साही वातावरण होते. गणपती उत्सवाचे प्रमुख अतुल मनोहर, रवींद्र भोईटे, वृषाली धर्माधिकारी,अश्विनी मिसाळ हे होते. यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे सहकार्य लाभले.

विवेकानंद निवासी विभाग

विवेकानंद प्रतिष्ठान निवासी विभागात अत्यंत भावपूर्ण वातावरणात पर्यावरणपूरक श्री. गणपती बाप्पाचे विसर्जन निवासी प्रमुख शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. रविवारी सकाळी राधेशाम पाटील यांच्याहस्ते सपत्नीक सत्यनारायणाची पूजा करण्यात आली. त्यानंतर बालगोपाळ मंडळी नमन पाटील, तेजस पाटील, कुंदन पाटील, सर्वज्ञ जोशी, वरद कुळकर्णी, पुर्व पाटील, सिद्धी कुरकुरे यांच्याच्याहस्ते गणपतीची ऊत्तर पुजा व आरती करण्यात आली. पौरहित्य मधुसुदन जोशी यांनी केले.

त्यानंतर ढोलताशांच्य गजरात मिरवणुक निघाली. शेवटी बालगोपाळ मंडळीच्या हस्ते श्री.गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. यावेळी सर्व शिक्षक, सेवक बंधु, विद्यार्थी, परिवारासह उपस्थित होते.

जळगाव पीपल्स बँकेकडून पोलिसांना फुड पॅकेट वाटप

यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मिरवणुकीस बंदी आहे असली तरी 19 सप्टेंबर रोजी गणपती विसर्जनासाठी ड्युटीवर असलेले पोलीस कर्मचारी व अधिकार्‍यांंना जळगाव पीपल्स बँकेच्यावतीने त्यांच्या ड्युटीच्या जागेवर जाऊन सकाळी व संध्याकाळी अत्यंत उत्कृष्ट दर्जाचे जेवणाचे पॅकेटस् देण्यात आले. या पॅकेटमध्ये सकाळी पराठे, छोले भाजी, बटाटा रस्सा भाजी, व्हेज बिरयानी, गुलाब जामुन व 1 लिटरची शुद्ध पाण्याची बाटली असे स्वादिष्ट जेवण हवाबंद डब्यामध्ये पॅकींग करुन देण्यात आले.

या उपक्रमांतर्गत एकुण 1200 फुड पॅकेटस्चे वाटप पोलीस कर्मचारी, होमगार्ड इ. यांना बँकेकडून करण्यात आले.या उपक्रमाचे हे आठवे वर्ष आहे. जळगाव शहर पोलीस स्टेशन येथे पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत,डीवायएसपी कुमार चिंथा, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, विजयकुमार ठाकुरवाड यांच्याहस्ते पोलीस बंधु भगिनींना प्रातिनिधीक स्वरुपात फुड पॅकेट वाटपास सुरुवात करण्यात आली.

यावेळी बँकेचे संचालक व माजी चेअरमन भालचंद्र पाटील, संचालक डॉ.सी.बी.चौधरी, ज्ञानेश्वर मोराणकर, बँकेचे सीईओ दिलीप देशमुख उपस्थित होते. जळगाव पीपल्स बँकेतर्फे राबविल्या जाणार्‍या या उपक्रमाबद्दल पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे यांनी बँकेचे संचालक भालचंद्र पाटील यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार केला.

बँकेच्या या उपक्रमासाठी रविंद्र कोष्टी, राजेंद्र जोशी, गोविंद खांदे, विशाल कोल्हे, शुभम देशमुख, गोविंदा माळी, दिलीप महाजन, दिपक साळी, अतुल भंगाळे,योगेश काळे, रामकृष्ण पाटील,सचिन चौधरी यांनी सहकार्य केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com