फैजपुरच्या मंडळ अधिकार्‍यांचा माजी नगराध्यक्षांवर आरोप : म्हणाले जीवे ठार मारण्याचा केला प्रयत्न

फैजपुरच्या मंडळ अधिकार्‍यांचा माजी नगराध्यक्षांवर आरोप : म्हणाले जीवे ठार मारण्याचा केला प्रयत्न

यावल Yaval ( प्रतिनिधी )

तालुक्यातील फैजपूर (Faizpur) येथील मंडळ अधिकारी (board officials) एम. एच. तडवी हे बुधवारी रात्री चार चाकी वाहनाने (Vehicle) तालुक्यातील सावखेडा येथे जात असताना विरावली गावाजवळ समोरून येणारे डंपरने (Dumper) त्यांची वाहनास जोरदार धडक (Strong beating) देत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न (Attempt to kill) केला असल्याची तक्रार तडवी यांनी येथील पोलीस (police) ठाण्यात दिली आहे तडवी यांनी दिलेल्या फिर्यादीत फैजपूरचे माजी नगराध्यक्ष (former mayor) निलेश उर्फ पिंटू राणे (Pintu Rane) यांचे वर संशय व्यक्त केला आहे.

या संदर्भात फैजपूर तालुका यावल येथील मंडळ अधिकारी एम एच तडवी (Board Officer M.H. Tadvi) यांनी येथील पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत (complaint) म्हटले आहे की मी बुधवारी रात्री मुलगा बिलाल तडवी सह चार चाकी वाहन (Vehicle) क्रमांक एम. एच. १९सीझेड ने तालुक्यातील सावखेडासिम आपल्या गावी जात असताना रात्री ८ , ४५ वाजेच्या सुमारास विरावली गावाजवळ दहीगाव कडून भरधाव वेगात येत असलेला डंपरने (Dumper), मला आणि माझ्या मुलास जीवे ठार मारण्याच्या (Attempt to kill) उद्देशाने आमच्या चारचाकी वाहनास जबर धडक (Strong beating) दिली बचावासाठी मी वाहन रस्त्याच्या कडेस खाली उतरवले घटनेनंतर डंपर चालक सुसाट वेगात निघून गेला. या घटनेत तडवी यांच्या चारचाकी वाहनाचे २५ते ३० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

फिर्यादीमध्ये मंडळ अधिकारी तडवी यांनी आपणास जीवे ठार मारण्याच्या उद्देशानेच धडक दिली असल्याचे म्हणत फैजपूर येथील माजी नगराध्यक्ष निलेश ऊर्फ पिंटू राणे (Pintu Rane) यांच्यावर संशय व्यक्त केला आहे विविध कलमान्वये येथील पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक अशित कांबळे पुढील तपास करत आहेत

फैजपूर मंडळ अधिकारी व तलाठी कार्यालयात दोन दिवसापूर्वी मी गेलो होतो त्या ठिकाणी सर्कल व तलाठी उपस्थित नव्हते फेसबुकला मी यासंदर्भात लाईव्ह केले होते व तहसीलदार यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून तोंडी तक्रार केली होती त्याचा राग येऊन संबंधित मंडळ अधिकारी यांनी यावल पोलिसात माझ्या विरोधात खोटा गुन्हा दाखल केला आहे . नव्हे तर आज पर्यंत मी रेती वाहतुकीचा धंदा केलेला नाही किंवा माझ्याकडे डंपर सुद्धा नाही ज्या डंपरचा अपघात झाला असेल त्याची रीतसर पोलिसांनी चौकशी करून गुन्हा दाखल करावा . माझ्या विरुद्ध केलेल्या आकसापोटी तक्रारी बाबत कायदे तज्ञांशी मी चर्चा करत असून याबाबत आपण माझे उच्च न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे फैजपूर माजी नगराध्यक्ष पिंटू राणे तथा निलेश राणे यांनी देशदूत शी बोलतांना प्रतिक्रिया दिली . पोलीस खाते त्यांचं काम करतील कायदेशीर बाबी तपासतील जे काही दूध का दूध और पानी का पानी समोर येईलच असेही त्यांनी शेवटी सांगितले

निलेश ऊर्फ पिंटू राणे माजी नगराध्यक्ष फैजपुर तालुका यावल

Related Stories

No stories found.