शांततेच्या वातावरणात लोकशाहीच्या ‘या’ प्रक्रियेला सामोर जा !

पोलिस प्रशासनाचे आवाहन
शांततेच्या वातावरणात लोकशाहीच्या ‘या’ प्रक्रियेला सामोर जा !

शेळावे ता पारोळा - वार्ताहर Parola

पारोळा तालुक्यातील ५८ ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणुक होत आहे. माघारी नंतर लढतीचे चित्र स्पष्ट झाल्याने गावोगावी प्रचाराला सुरुवात झाली आहे.

ही संपुर्ण प्रक्रिया पारदर्शक, शांततेत व खेळीमेळीच्या वातावरणात व्हावी म्हणुन तालुक्यातील महत्वाच्या व मोठ्या गावांपैकी शेळावे बु व शेळावे खु.चिखलोद ग्रामपंचायतींची निवडणुक लागली आहे, मोठा उत्साह व चुरस आहे. या लोकशाहीच्या आनंदोत्साहाला गालबोट लागु नये, निवडणुका येतील व जातील पण गावाचे गुण्यागोविंदाने राहण्याच्या वातवरणाला बाधा पोहचु नये म्हणुन पारोळा पोलिस स्थानकाचे निरीक्षक लिलाधर कानडे यांनी उमेदवार व ग्रामस्थ यांच्या बैठक घेवुन मार्गदर्शन करून समुपदेशन केले.

या निवडणुकीला शांततेत सामोरे जावुन गावाचा एकोपा निरंतर अखंड ठेवण्याचे आवाहन केले. याप्रसंगी माजी सरपंच राजेंद्र पाटील, पोलीस पाटील सुकलाल पाटील, पोलीस पाटील प्रदीप पाटील, डॉ.शांताराम गिते, शफी खाटीक, प्रकाश पाटील आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com