विशेष रेल्वे गाड्यांना मार्च महिन्यापर्यंत मुदतवाढ

विशेष रेल्वे गाड्यांना मार्च महिन्यापर्यंत मुदतवाढ

भुसावळ Bhusaval । प्रतिनिधी

मध्य रेल्वेतर्फे (Central Railway) चालविण्यात येणार्‍या काही विशेष गाड्यांचा (special trains) कालावधी (Extension मार्च (March) महिन्यापर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

या गाड्यांमध्ये, गाडी क्र. 02107 एलटीटी - लखनऊ विशेष गाडी 1 नोव्हेंबर ते 30 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. गाडी क्र. 02108 लखनऊ - एलटीटी 2 नोव्हेंबर ते 31 मार्च पर्यंत (मंगळवार, गुरुवार, रविवार) चालविण्यात येणार आहे. गाडी क्र. 02165 एलटीटी- गोरखपूर विशेष (सोमवार, गुरुवार, शुक्रवार) 29 ऑक्टोबर ते 31 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 02166 गोरखपूर -एलटीटी विशेष (मंगळवार, शुक्रवार, शनिवार) 30 ऑक्टोबर ते 1 एप्रिलपर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे.

गाडी क्र. 01079 एलटीटी - गोरखपूर विशेष (गुरुवार) 4 नोव्हेंबर ते 31 मार्चपर्यंत मुदतवाढ. गाडी क्र. 01080 गोरखपूर -एलटीटी विशेष (शनिवार) 6 नोव्हेंबर ते 2 मार्चपर्यंत मुदतवाढ. 02101 एलटीटी - शालीमार (सध्या हावडा) विशेष (सोमवार, मंगळवार, शुक्रवार, शनिवार) 1 नोव्हेंबर ते 29 मार्चपर्यंत मुदतवाढ. गाडी क्र. 02102 शालीमार (सध्या हावडा)- एलटीटी विशेष (सोमवार, बुधवार, गुरुवार, रविवार) 3 नोव्हेंबर ते 31 मार्चपर्यंत मुदतवाढ.

गाडी क्र. 01033 पुणे-दरभंगा विशेष (बुधवार) 3 नोव्हेंबर ते 30 मार्च पर्यंत मुदतवाढ. गाडी क्र. 01034 दरभंगा-पुणे विशेष (शुक्रवार) 5 नोव्हेबर ते 1 एप्रिलपर्यंत मुदतवाढ. 01407 पुणे- लखनऊ विशेष (मंगळवार) 2 नोव्हेंबर ते 29 मार्चपर्यंत मुदतवाढ. 01408 लखनऊ- पुणे विशेष (गुरुवार) 4 नोव्हेंबर ते 31 मार्चपर्यंत. 01115 पुणे- गोरखपूर विशेष (गुरुवार) 4 नोव्हेंबर ते 31 मार्चपर्यंत. 01116 गोरखपूर- पुणे विशेष (शनिवार) 6 नोव्हेंबर ते 2 एप्रिलपर्यंत. 02135 पुणे- मंंडुआडीह विशेष (सोमवार) 1 नोव्हेंबर ते 28 मार्चपर्यंत. गाडी क्र. 02136 मंडुआडीह- पुणे विशेष (बुधवार) 3 नोव्हें बर ते 30 मार्चपर्यंत. गाडी क्र. 02099 पुणे- लखनऊ विशेष (मंगळवार) 2 नोव्हेंबर ते 29 मार्चपर्यंत. 02100 लखनऊ- पुणे विशेष (बुधवार) 3 नोव्हेंबर ते 30 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. प्रवाशांनी मुदत वाढ झालेल्या विशेष गाड्यांचा लाभ घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Related Stories

No stories found.