
जळगाव jalgaon । प्रतिनिधी
जिल्ह्यात लिलाव झालेल्या (Auctioned) वाळू ठेक्यातून उपसा (Extraction from sand dunes) करण्याची मुदत गुरूवारी संपुष्टात आली आहे. आता जिल्ह्यात कुठल्याही वाळु घाटातून (sand dunes) उपसा करता येणार नसल्याची माहिती प्रशासकीय सुत्रांनी दिली. दरम्यान वाळू चोरी रोखण्याचे प्रशासनासमोर (administration) आव्हान (challenge) उभे ठाकले आहे.
जळगाव जिल्ह्यात यंदा वाळु घाटांची ((sand dunes)) लिलाव प्रक्रिया (Auction Process) न्यायालयाच्या (Court) आदेशामुळे स्थगित राहीली. यात काही घाटांचे लिलाव आधीच झाल्याने त्या घाटातुन वाळु उपसा करण्याला परवानगी होती.
यात अमळनेर तालुक्यातील हिंगोणेसिम, रूंधाटी, चोपडा तालुक्यातील कोळंबा, पाचोरा तालुक्यातील परधाडे, भडगाव तालुक्यातील वडधे आणि यावल तालुक्यातील थोरगव्हाण याठिकाणाहून वाळु उपसा सुरू होता. आता या सहा घाटांसह इतर कुठूनही वाळु उपसा करण्याला बंदी घालण्यात आली आहे.
वाळू चोरीवर करडी नजर
जिल्ह्यातील वाळु घाटांची मुदत संपुष्टात आली असली तरी बहुतांश घाटातुन वाळुचा अवैधरित्या उपसा केला जातो. आता जिल्ह्यात होणार्या वाळु चोरीवर जिल्हा प्रशासनाला (administration) करडी नजर ठेवावी लागणार आहे. तसेच पावसाळ्यामुळे वाळु घाटांचे लिलाव होणे शक्य नसल्याने पुढील वर्षी नव्याने लिलाव प्रक्रिया राबवावी लागणार आहे.