
सुषलर भालेराव । जळगाव jalgaon
वातावरणातील बदलामुळे (Climate change) गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोर (cold snap) वाढला आहे. हुडहुडी भरविणार्या थंडीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, रात्री थंडी आणि दिवसा उष्ण अशा परस्पर विरुध्द वातावरणाचा सामना करावा लागत आहे. आगामी आठवडाभर अशाच वातावरणाशी सामना करावा लागणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या वातावरणाचा परिणाम आरोग्यावर (health) जाणवत असून थंडी, ताप, कफ, सर्दी, खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ झालेली आहे. विशेषतः या लक्षणांनी सर्वच कमी अधिक प्रमाणात ग्रासले गेले आहेत.
जागतिक तापमान वाढीचे परिणाम हे दररोजच्या बदलत्या हवामानाच्या अंदाजातून येत असतात. सध्याच्या वातावरणातून दिवसा उन्हाळ्याची चाहुल आणि रात्री हिवाळ्याचा अनुभव येत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे उत्तर भारतातील हवेमुळे जे काही बदल होतात. त्याचे परिणाम आपल्याकडे जाणवू लागतात. त्यामुळेच सध्या उन्हाळा व हिवाळा असे दोन्ही ऋतू अनुभवायला मिळत आहे. येत्या आठवडाभर हे वातावरण जैसे थे राहण्याचे संकेत आहेत.
काय काळजी घ्याल?
हवामान बदलामुळे होणार्या व्हायरल इन्फेक्शनपासून बचावासाठी शक्यतो या काळात थंड व आंबट पदार्थ खाणे टाळावे, शक्यतो ताजेच अन्न सेवन करावे, बाहेरील पदार्थ टाळावे, पाणी उकळून प्यावे, ब्रॉन्कायटिसच्या रुग्णांनी तर मॉर्निंग वॉक टाळणेच सोयीस्कर, दिवसभर कोमटच पाण्याचे सेवन करावे. बालकांकडे विशेष लक्ष द्यावे.
सिजनेबल चेंज
वातावरणातील बदल हा ऋतुमानाचा बदल असलातरी मानवी आरोग्यावर याचे परिणाम जाणवतात. यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू लागतात.सद्या या समस्यांनी सर्वांनाच ग्रासल्याचे पहावयास मिळत आहे. यापासून बचावासाठी प्रत्येकाने आपली व आपल्या परिवारातील सदस्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञ करीत आहेत.
विषम वातावरण दिवसा उष्ण आणि रात्री थंड अशा विषम वातावरणाचा आरोग्यावर परिणाम होतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आरोग्याच्या तक्रारी आहेत. विषम वातावरणामुळे कफ, सर्दी, श्वसन विकार, थंडी, ताप, खोकल्याच्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे.
डॉ.दीपक चव्हाण, जळगाव