जास्त उंचीची देवी मुर्तीची स्थापना पडली महागात

चाळीसगावात दोन दुर्गा मंडळांवर गुन्हे दाखल
 जास्त उंचीची देवी मुर्तीची स्थापना पडली महागात
USER

चाळीसगाव Chalisgaon प्रतिनिधी -
कारोना महामारीत नवरात्रोत्सवासाठी शासनाने नियावली घालून दिली आहे. या नियावलीचे उल्लघन करीत, चाळीसगाव येथील दोन दुर्गा मंडळाने (Durga Mandal) चार फुटापेक्षा जास्त उंचीची (High altitude) ( ८ ते १० फुट) मुर्तीची स्थापना (Establishment of the statue) करणे चांगलेच महागात पडले आहे. चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला (City Police Station) दोघां मंडळाविरोधात गुन्हां (Crimes) दाखल करण्यात आला आहे.

शहरातील नेताजी पालक चौकातील नवदुर्गा मित्र मंडळाने कारोना नियमावलीचे उल्लघन करुन, चार फुटापेक्षा जास्त म्हणजे तब्बल ८ ते १० फुट उंचीची मुर्तीची स्थापना केली. त्यामुळे मंडळाचे पदाधिकारी कैलास उत्तमराव पाटील, शेख अमीर शेख निसार, शुभम बोरसे, एकनाथ सोमवंशी सर्व रा.नेताजी चौक यांच्या विरोधात भादवी कलम १८८, २६९, २७० प्रमाणे गुन्हां दाखल केला आहे.

तर दुसर्‍या घटनेत शहरातील हिरापूर येथील गवळी वाड्यातील जय मातादी मित्र मंडळाने देखील चार फुटापेक्षा जास्त मुर्तीची स्थापक केली. म्हणून पोहेकॉ. पंढरीनाथ पवार यांच्या फिर्यांदीवरुन चाळीसगाव पोलीस स्टेशनला मंडळाचे पदाधिकारी ललीत सुरेश गवळी, रविंद्र सुरेेश गवळी, तुळशीराम सुदाम गवळी, किरण दिपक गवळी सर्व रा. गवळीवाडा हिरापूर रोड, चाळीसगाव यांच्या विरोधात भादवी कलम १८८,२६९,२७० प्रमाणे गुन्हां दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Related Stories

No stories found.