बेताच्या परिस्थितीत गुरूशिष्याच्या चढाओढीत गुंजनची चित्रकला बहरली

13 वर्षीय गुंजनच्या चित्रांचे 3 मार्चपासून प्रदर्शन
बेताच्या परिस्थितीत गुरूशिष्याच्या चढाओढीत गुंजनची चित्रकला बहरली

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

ओरियन स्कूलची इयत्ता सातवीची 13 वर्षीय गुंजन प्रसाद सावंत (Gunjan Prasad Sawant) हिच्या चित्रांचे प्रदर्शन दि 3 मार्चपासून सुरू होत आहे. अगदी लहान वयातच चित्रांची (paintings) आवड जोपासणार्‍या गुंजनमधील गुण चित्रकला शिक्षक तरुण भाटे यांनी ओळखले आणि गुंजनला दत्तक घेत तिला चित्रकला प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. गुरू शिष्यांमध्ये चढाओढ सुरू झाली. यात तिचे चित्र व त्यातील चुका निदर्शनात आणून देतांना सहजपणे तिला एक उत्कृष्ठ चित्रकार बनवण्याचा सिलसिला सुरू झाला. आपल्या गुरूच्या मार्गदर्शनानुसार मग गुंजनची वाटचाल सुरू झाली. तीच्या या चित्रांचे प्रदर्शन (paintings Exhibition) 2 मार्चपासून शहरातील पु.ना. गाडगीळ आर्ट गॅलरीत होत आहे.

बेताच्या परिस्थितीत गुरूशिष्याच्या चढाओढीत गुंजनची चित्रकला बहरली
बारावीच्या विद्यार्थ्यांनो इकडे लक्ष द्या : जुनपासून पदवी अभ्यासक्रम राहणार चार वर्षाचा..
गुंजन प्रसाद सावंत
गुंजन प्रसाद सावंत
बेताच्या परिस्थितीत गुरूशिष्याच्या चढाओढीत गुंजनची चित्रकला बहरली
Makeup Part 6 : न्यू जनरेशन कॉस्मेटिक्स

यात तिने चित्रकलेला आत्मसात करत विविध प्रकार अगदी अल्प दिवसात शिकुन घेतले. शिक्षणात मुख्या अडचण पैश्याची घरातील परिस्थिती बेताची वडील एस.टी. परिवहनमध्ये वाहक त्यामुळे येणारी अडचण कलाप्रेमी तरुण भाटे यांनी सोडवली व आपल्या शिष्याला घडवले.

बेताच्या परिस्थितीत गुरूशिष्याच्या चढाओढीत गुंजनची चित्रकला बहरली
Makeup Part 5 : असा करा कियारा, कतरीना व आलिया सारखा नैसर्गिक मेकअप

सोलो आर्ट व स्केच प्रकारात प्रभुत्व मिळवत काढलेल्या चित्रांना प्रदर्शित करण्यासाठी पु.ना.गाडगीळने प्रोत्साहन देत जागा उपलब्ध करून दिली. 2 मार्च रोजी प्रदर्शनाचे उद्घाटन माजी परिवहन मंत्री गुलाबराव देवकर, जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन, रा.प.म व्यवस्थापक निलीमा बागुल, ओरीयन सीबीएसई स्कूलच्या प्राचार्य सुषमा कांची, पु.ना. गाडगीळ अँन्ड सन्स व्यवस्थापक संदीप पोतदार, कला शाळा संस्थापक तरुण भाटे यांच्या हस्ते सायंकाळी 6 वा होणार आहे.

बेताच्या परिस्थितीत गुरूशिष्याच्या चढाओढीत गुंजनची चित्रकला बहरली
25 कोटींची पाणी पुरवठा योजना तरीही वरणगावकरांच्या नशिबी पाणी टंचाईच...

रोज सकाळी 11 वा. ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत हे प्रदर्शन प्रेक्षकांची खुले राहणार आहे. चित्र प्रदर्शनात 13 वर्षीय गुंजनने अनेक साधुसंत, क्रांतीकारक, निर्संगातील प्राणी अशा विविध प्रकारची चित्र रेखाटली आहे.

शालेय विद्यार्थ्यांनी आर्वजून पाहावे असे हे प्रदर्शन दि 15 मार्चपर्यंत सुरु राहणार आहे. नागरिकांनी प्रदर्शनास उपस्थिती द्यावी, असे आवाहन गुजंन सावंत व तरुण भाटे यांनी केले आहे.

बेताच्या परिस्थितीत गुरूशिष्याच्या चढाओढीत गुंजनची चित्रकला बहरली
रेमंड बंदसाठी खान्देश युनियनच जबाबदार ?
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com