बैलपोळा होणार उत्साहात : रंगीबेरंगी साहित्यांनी बाजारपेठ सजली

बैलपोळा होणार उत्साहात : रंगीबेरंगी साहित्यांनी बाजारपेठ सजली

पिंपळगाव हरे Pimpalgaon Hare ता.पाचोरा, वार्ताहर

बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा शेतकऱ्यांचा (farmers) उत्साहाचा सण म्हणजे ‘पोळा’ (Bull pola) सणानिमित्त पिंपळगाव हरेश्वर येथील बाजारपेठ (market) सजली असून बैलांच्या साजाची दुकाने (Shops for bullocks) गावातील बाजारात जागोजागी थाटली आहेत. मागील दोन वर्षांपासून कोरोनाचे (Corona) सावट असल्याने अनेक निर्बंध होते. मात्र, यावेळी कोणतेही निर्बंध नसल्याने आणि वर्षातून एकदाच येणाऱ्या या सणासाठी शेतकरी सज्ज झाला आहे. बैलांच्या साजाची दुकाने तसेच मातीचे बैल विक्री करणारे दुकाने निरनिराळे व विविध रंगीत बैल जोड्या घेऊन बाजारपेठेत येत आहेत.

शेतकऱ्यांच्या मित्र असणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतकरी बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरी करतो. येत्या शुक्रवारी, 26 तारखेला हा सण सर्वत्र उत्साहात व पारंपारिक पध्दतीने साजरा केला जाणार आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी हा सण काही वेगळाच असतो. या सणानिमित्त शेतकरी आठवडाभर तयारी करून मोठ्या उत्साहात सण साजरा केला करतो. यंदा पाणी पुरेसा नसल्यामुळे कोरड्या दुष्काळाचे संकट आहे. यातच महागाईची छाया आहे, तरी देखील शेतकरी बैलांचा सण करण्यासाठी बाजारात खरेदीसाठी येत आहे. बाजार देखील साहित्याने भरला आहे.

अतिवृष्टीमुळेे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बिकट.


शेतकरी हा कृषिप्रधान देशाचा राजा मानला जातो. परंतु, गेल्या काही वर्षांपासून अवकाळी परिस्थितीमुळे कमी उत्पादन, पिकांना मिळणारा कमी भाव यामुळे शेतकरी दिवसेंदिवस आर्थिक संकटात अडकत चालला आहे. असे असले तरी, पोळा सण साजरा करणासाठी शेतकऱ्यातील उत्साह कमी होत नाही

पोळा सणाला अनन्यसाधारण महत्त्व

पोळ सणाला शेतकरी समाजात खूप महत्त्व दिले जाते. शेतात चांगले उत्पादन घेण्यासाठी शेतकरी व मजुरांबरोबरच बैलजोडीचेही योगदान आहे. पोळ्यानिमित्त शेतकरी बैलजोडीला साज चढवतात आणि गावात बँडच्या सहाय्याने वाजत गाजत मिरवणूक काढतात. या दिवशी शेतकरी आपल्या घरी गोड पदार्थ बनवतात. आपल्या कुटुंबातील मुलांसाठी तसेच मजुरांसाठी नवीन कपडे खरेदी करतात. गेल्या २ वर्षांपासून कोरोनामुळे पोळा सण साधेपणाने साजरा केला जात होता, मात्र यावेळी कोणतेही निर्बंध नसल्याने सर्वांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. कापड बाजारातून इतर फर्निशिंगच्या वस्तू खरेदीसाठी लाखोंचा व्यवसाय होण्याची शक्यता आहे.

बैलांच्या सजावटीच्या वस्तू दाखल

पोळा सणासाठी सजावटीच्या वस्तू बाजारात दाखल झाल्या आहेत. पिंपळगाव हरेश्वर येथील कालिंका माता मंदिर चौक परिसरात बाजारात मोठ्या प्रमाणात दुकाने थाटली. कासरे, खंडोर, मोरका, माथाडी, बेगडी, चावर, गेरू, नायलॉन, रेशम, येसेन, सुतावंडा आदी बैलांच्या सजावटीचे साहित्य दुकानांमध्ये उपलब्ध आहे.

झील/घुंगरू 500 ते 800 रुपये, तास 800 ते 1000 रुपये, पितळ तुटलेले 1200 रुपये प्रति किलो, खंडोर 120 ते 250 रुपये, माथाडी 70 ते 250 रुपये, मोरका 80 ते 200 रुपये, फॅन्सी वस्तू 80 ते 200 रुपये, नत्र 200 ते 350 रुपये प्रति किलो, बाशिंग 60 ते 120 रुपये आहे.

यंदा ग्राहकांचा चांगला प्रतिसाद

गेल्या 2 वर्षांच्या तुलनेत यंदा ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. येत्या काही दिवसात बाजारपेठेत खरेदी वाढणार आहे, प्रत्येक शेतकरी खांबावरील घुंगराचे साहित्य खरेदी करतो. हे सर्व साहित्य जळगाव,नाशिक, बर्हानपुर, नागपूर, अमरावती, सुरत, अहमदाबाद येथून येते. वाहतुकीत वाढ झाल्याने वस्तूंचे दर देखील वाढले असल्याची माहिती बाजारातील दुकान धारक यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com