एटीएमकार्डची अदलाबदली; तरुणाला 38 हजारांचा गंडा

जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल
एटीएमकार्डची अदलाबदली;  तरुणाला 38 हजारांचा गंडा

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

शहरातील प्रताप नगरातील (Pratap Nagar) स्टेट बँकेत (State Bank) एटीएममध्ये (Atm) पैसे काढण्यासाठी (withdraw money) आलेल्या तरूणाला (young man) अज्ञात व्यक्तीने (unknown person) बोलण्यात गुंतवून एटीएम आदलाबदली (ATM exchange) करून खात्यातून (account) 37 हजार 500 रूपये काढून (Withdraw Rs) नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शनिवारी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील सुप्रिम कॉलनी परिसरातील गजानन मंदिर परिसरात विठ्ठल मेरचंद पवार (वय-38) हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. मजूरी करून आपला उदरनिर्वाह करतो. शनिवारी दि. 17 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास विठ्ठल पवार हा कामाच्या निमित्ताने जळगाव शहरात आला होता.

प्रताप नगरातील स्टेट बँकेच्या मुख्य शाखेत आला होता. बँकेच्या बाहेर असलेल्या एटीएममधून पैसे काढत असतांना एका अनोळखी व्यक्तीने विठ्ठल पवार याला बोलण्यात गुंतवून ठेवत त्याच्या एटीएमची आदला बदल केली. त्यानंतर पैसे निघाले नाही म्हणून विठ्ठल पवार बाहेर निघाला.

थोड्यावेळानंतर त्यांच्या खात्यातून अज्ञात व्यक्तीने 37 हजारर 500 रूपये काढून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला. याबाबत विठ्ठल पवार यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com