फिजिओथेरीपी दिनी उडान दिव्यांग प्रशिक्षण केंद्रात दिव्यांगांसह पालकांची झाली तपासणी

फिजिओथेरीपी दिनी उडान दिव्यांग प्रशिक्षण केंद्रात दिव्यांगांसह पालकांची झाली तपासणी

जळगाव jalgaon

येथील रुशील मल्टिपर्पज फाऊंडेशन (Rushil Multipurpose Foundation) संचलित उडान दिव्यांग प्रशिक्षण केंद्रात (Udan Divyang Training Center) फिजिओथेरपी दिवस (Physiotherapy day) साजरा (celebrated) करण्यात आला.

यात केंद्रातील दिव्यांग तसेच पालकांची मोफत तपासणी आणि उपचार करण्यात आले. 150 जणांनी या शिबिराचा लाभ घेतला.

यावेळी समाजकल्याण चे भरत चौधरी, पुष्पाताई भंडारी, धनराज कासाट, विनोद बियाणी, एस. पी.गणेशकर उपस्थित होते. फिजिओ थेरीपीस्ट डॉ. निखिल पाटील, डॉ प्रीती पाटील, डॉ आदित्य खाचणे, डॉ केतकी साखळकर, डॉ. रिद्धी भंडारी. डॉ. अश्विनी मोलेकर व त्यांच्या सहकार्‍यांनी तपासणी आणि उपचार केले.

सूत्रसंचालन उज्वला वर्मा यांनी केले. कार्यक्रमासाठी उडानच्या अध्यक्ष हर्षाली चौधरी, चेतन वाणी, जयश्री पटेल, हेतल वाणी, सोनाली भोई, अनिता पाटील यांनी परिश्रम घेतले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com