शौचालय घोटाळ्यातील आजी-माजी विस्तार अधिकारी यांचा पोलीस कोठडीतील मुक्काम वाढला

शौचालय घोटाळ्यातील आजी-माजी विस्तार अधिकारी यांचा पोलीस कोठडीतील मुक्काम वाढला

रावेर Raver|प्रतिनिधी-

शौचालय घोटाळ्यातील (toilet scam) आरोपीची (accused) पोलीस कोठडीतून (Police custody) न्यायलयीन कोठडीत (judicial custody) रवानगी सुरु असतांना अटकेतील आजी माजी विस्तार अधिकारी (Grandmother is a former extension officer) यांना आज रावेर न्यायालयात हजर केले असता दि.२८ जुलै पर्यत पोलीस कोठडी (Police custody) सुनावण्यात आली आहे.तर उर्वरित दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

पंचायत समितीत झालेल्या शौचालय घोटाळ्यात आता पर्यंत १२ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.या गुन्ह्याची व्याप्ती पाहता तब्बल १२५ जणांना वर संशयाची सुई आहे.पोलीस या गुन्ह्याची उकल करण्यासाठी वारंवार आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी करत आहे.अटकेतील १२ पैकी १० जणांना न्यायालयीन कोठडी मध्ये रवाना करण्यात आले आहे,तर सेवानिवृत्त विस्तार अधिकारी डी.एच.सोनवणे व विस्तार अधिकारी दीपक संदानशिव यांना मात्र दि.२८ जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

न्यायालयीन कोठडीत याआधी गेलेल्या ८ जणांनी जामिनासाठी अर्ज केला आहे.त्या अनुषंगाने आरोपीच्यावतीने युक्तीवाद करण्यात आला आहे.तर मंगळवारी सरकारी वकील यांच्या युक्तिवाद होणार आहे.त्यानंतर जामिनावर सुनावणी होण्याची शक्यता आहे.आरोपीच्या वतीने अॅॅड.धनराज ई पाटील व अॅॅड टी.डी.पाटील यांनी काम पहिले.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com