खोके दिले तरी मतदार आमच्याच बाजूने ; आ. खडसेंचा घणाघात

एकनाथराव खडसे
एकनाथराव खडसेEknathrao Khadase

जळगाव jalgaon। प्रतिनिधी

जिल्हा दूध संघात (District Milk Union) खडसे परिवाराला (Khadse family) रोखण्यासाठी (prevent) जिल्ह्यातील सत्ताधार्‍यांनी सत्तेचा (rulers of the district) गैरवापर (Abuse of power) करून उमेदवारीबाबतचा नियम शेवटच्या 15 मिनीटात बदलविल्याचा खळबळजनक (Sensational allegations) आरोप राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे (NCP leader MLA Eknathrao Khadse) यांनी आज पत्रकार परिषदेत केला. दरम्यान दूध संघाच्या निवडणूकीत कितीही पेट्या, खोके (Given any number of boxes, boxes) दिले तरी मतदार आमच्याच (Voters are on our side)बाजूने असल्याचा घणाघातही त्यांनी केला.

जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत आज संपली. यानंतर राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. आ. खडसे पुढे म्हणाले की, दूध संघाच्या निवडणुकीसाठी मंत्री, आमदार, माजी आमदार अशा दिग्गजांनीही अर्ज दाखल केले. दूध संघाच्या इतिहासात कधी नव्हे तो एवढ्या मोठ्या प्रमाणावर उमेदवारी अर्ज दाखल झाले. कारण याठिकाणी संचालक मंडळाने उत्तम काम केले. गेल्या सात वर्षांपासून अत्यंत पारदर्शक कारभार राहिला आहे.

त्यामुळेच हा दूध संघ नफ्यात आला असून सातत्याने ‘अ’ वर्गात राहिला आहे. दूध संघ चांगल्या स्थितीत आल्याने या संघावर अनेकांच्या नजरा लागल्या असून जिल्ह्यातील मंत्र्यांनाही याचा मोह आवरता आला नसल्याची टीका त्यांनी केली. दूध संघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याकरीता उमेदवाराचे नाव हे त्या तालुक्याच्या मतदार यादीत असणे अनिवार्य असतांना मंगेश चव्हाणांनी मुक्ताईनगरातून उमेदवारी अर्ज भरला आहे. ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया राजकीय दबावाखाली होत असून याबाबत आम्ही छाननीच्या प्रक्रियेत आक्षेप घेऊन न्यायालयातही दाद मागणार असल्याची माहिती आ. खडसे यांनी दिली.

दूध संघाचे फॉरेन्सीक ऑडीट करा

जिल्हा दूध संघात गेल्या सात वर्षापासून संचालक मंडळाने चांगले काम केले आहे. आ. मंगेश चव्हाण यांना आत्ताच कसा भ्रष्टाचार दिसला? असा सवाल करीत दूध संघाचे संपूर्ण सात वर्षाचे फॉरेन्सीक ऑडीट करावे अशी मागणी खुद्द आ. एकनाथराव खडसे यांनी केली. तसेच जिल्हा दूध संघातील चोरीविषयी जबाब बदलविण्यासाठी दबाव टाकणारे एपीआय संदीप परदेसी यांना निलंबीत करावे अशी मागणीही त्यांनी केली.

मंगेश चव्हाण तर गोधडीत होते

जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी वाढविण्यासाठी माझे योगदान राहीले आहे. ज्यावेळी आम्ही काम करीत होतो त्यावेळी आ. मंगेश चव्हाण हे गोधडीत होते. आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचे काम ते करीत असल्याची टीकाही आ. खडसे यांनी केली.

सर्व 20 जागांवर उमेदवार

खडसेंशिवाय सर्वपक्षीय पॅनल होऊच शकत नाही. त्यामुळे आम्ही सर्व 20 जागांसाठी उमेदवार उभे केले आहेत. महाविकास आघाडी म्हणून पॅनल देण्याचा आमचा प्रयत्न राहणार असल्याचे आमदार एकनाथराव खडसे यांनी यावेळी सांगितले.

काम चांगले तर भिती कसली?- आ. चव्हाण

जिल्हा दूध संघात पारदर्शक काम झाले आहे असे खडसे म्हणत असतील तर मग चौकशीसाठी भिती कसली? त्यांनी निवडणुकीला सामोरे जावे. जनता जो कौल देईल तो मान्य राहिल. उगाच निराधार आरोप करू नये. आ. खडसे स्वत: 12 खात्यांचे मंत्री असतांनाही जिल्हा बँकेत संचालक होते, तेव्हा त्यांना कसला मोह होता? असा टोलाही आ. मंगेश चव्हाण यांनी खडसेंना लगावला.

कायदेशीर आव्हान द्यावे - बिडवई

जिल्हा दूध संघाची निवडणूक प्रक्रिया ही उपविधीच्या नियमानुसारच सुरू आहे. ज्यांना कुणाला काही शंका असेल त्यांनी कायदेशीर आव्हान द्यावे त्यावर आम्ही निकाल देऊ अशी प्रतिक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी संतोष बिडवई यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com