खडसेंनी मीठाचे खडे टाकले तरी ठाकरे-पवार साखर करतील

आ.चंद्रकांत पाटील- एकनाथराव खडसे वादावर पालकमंत्र्यांचा मिश्कील टोला
खडसेंनी मीठाचे खडे टाकले तरी ठाकरे-पवार साखर करतील

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

माजी मंत्री एकनाथराव खडसे (Former Minister Eknathrao Khadse) हे काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीत (Nationalist) आले आहे. त्यामुळे त्यांनी कितीही मीठाचे खडे (salt stones) टाकले तरी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे(Party chief Uddhav Thackeray) आणि खा. शरद पवार (MP.Sharad Pawar) हे त्याला साखर (make sugar) करतील असा मिश्कील टोला पालकमंत्री गुलाबराव पाटील (Guardian Minister Gulabrao Patil) यांनी आज एका पत्रकार परिषदेत लगावला.

विधानसभा(Assembly) निवडणुकीच्या निकालापासून आमदार चंद्रकांत पाटील (MLA Chandrakant Patil) आणि माजी मंत्री एकनाथराव खडसेे (Former Minister Eknathrao Khadse) यांच्यात कुरघोडीचे राजकारण (politics) सुरू आहे. या दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. कधी निधीवरून तर कधी कामांवरून श्रेयाची लढाई खडसे आणि आ. चंद्रकांत पाटलांमध्ये होत आहे. दोन्ही नेत्यांच्या या वादासंदर्भात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, आमदार चंद्रकांत पाटील हे शिवसेनेचेच आहेत हे त्यांना सिध्द करण्याची गरज नाही.

खडसे आणि चंद्रकांत पाटील हे एकमेकांना डिवचत असले तरी त्यांनी तालुक्याचाही विकास साधण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करावे. एकनाथराव खडसे यांनी महाविकास आघाडीत कितीही मीठाचे खडे टाकण्याचा प्रयत्न केला तरी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे(Party chief Uddhav Thackeray) आणि खा. शरद पवार (MP.Sharad Pawar) हे त्याचे साखरेत रूपांतर करतील असा मिश्कील टोलाही पालकमंत्री गुलाबराव पाटील (Guardian Minister Gulabrao Patil) यांनी खडसेंना लगावला.

महाजनांना जामनेरमध्ये अडकवून ठेवा - डॉ. संजय सावंत

भाजपाचे (bjp) माजी मंत्री आमदार गिरीश महाजन(Former Minister MLA Girish Mahajan) यांना जिल्ह्यात पक्षाचे काम करण्यासाठी फिरू न देता जामनेरमध्येच अडकवून ठेवण्याची जबाबदारी आपली असून जामनेरचा गड शिवसेनेच्यादृष्टीने मजबूत करा असे आवाहन शिवसेनेचे (Shiv Sena) जळगाव लोकसभा संपर्कप्रमुख डॉ. संजय सावंत यांनी जिल्हा बैठकीत केले. जिल्ह्यात काही तालुकाप्रमुख काम न करता केवळ पद मिरवित आहेत. अशांना बाजूला करून नवीन कार्यकर्त्यांना संधी दिली जावी असेही त्यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com