काशिनाथ पलोड स्कूल मध्ये झाली विद्यार्थी परिषदेची स्थापना

हेड गर्ल मृण्मयी चौधरी, हेड बॉय आदित्य उत्तरदे ,अर्चित पाटील स्कूल इनोव्हेशन ॲबेसेटर
 काशिनाथ पलोड स्कूल मध्ये झाली विद्यार्थी परिषदेची स्थापना

जळगाव jalgaon

विवेकानंद प्रतिष्ठान (Vivekananda Pratishthan) संचालित काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल (Kashinath Palod Public School) मध्ये विद्यार्थी परिषदेची स्थापना (Establishment of Student Council) करण्यात आली . या परिषदेसाठी उमेदवार म्हणून उभे राहिलेल्या विद्यार्थ्यांची लोकशाही पद्धतीने मतदान करून निवड करण्यात आली .

उमेदवार विद्यार्थ्यांनी आपण निवडून येण्यास का पात्र आहोत हे विद्यार्थ्यांना प्रार्थनेच्या वेळेस सांगून प्रत्येक वर्गात जाऊन आपला प्रचार केल. ज्याप्रमाणे सार्वत्रिक निवडणुका घेतल्या जातात त्याच पद्धतीने वर्गांमध्ये मतदान करण्यासाठी खोल्या तयार करून मोबाईलवर बटन दाबून आपल्याला हव्या असलेल्या विद्यार्थ्यांना मुलांनी आपले मत देऊन आपले प्रतिनिधी म्हणून निवडले. या शाळेत घेण्यात आलेल्या निवडणुकीच्या माध्यमातून लोकशाही मध्ये निवडणूक प्रक्रिया कशी राबवली जाते .प्रत्येक व्यक्तीच्या मताचे महत्व काय असते हे विद्यार्थ्यांना या पूर्ण निवडणूक प्रक्रियेतून समजावून सांगून आणि भविष्यामध्ये ते देशाच्या प्रगतीमध्ये सहभागी होणारे किती महत्त्वपूर्ण घटक आहे याची जाणीव विद्यार्थ्यांना करून देण्यात आली.

यामध्ये हेड बॉय, हेड गर्ल ,स्पोर्ट्स सेक्रेटरी, कल्चरल सेक्रेटरी ,हाऊस कॅप्टन्स,व्हाईस कॅप्टन म्हणून इत्यादी पदांसाठी विद्यार्थी निवडले गेले .

यामध्ये हेड गर्ल मृण्मयी चौधरी, हेड बॉय आदित्य उत्तरदे ,कल्चरल सेक्रेटरी विनय पाटील ,स्पोर्ट्स सेक्रेटरी जतीन पाटील हे निवडून आले तर अर्चित पाटील याची स्कूल इनोव्हेशन ॲबेसेटर म्हणून निवड करण्यात आली.

निवडून आलेल्या विद्यार्थ्यांचा शपथविधी सोहळा आयोजित करण्यात आला होता .या सोहळ्यासाठी विवेकानंद प्रतिष्ठानच्या अध्यक्ष श्रीमती शोभाताई पाटील, डॉक्टर राहुल पाटील हे उपस्थित होते.

पाहुण्यांच्या हस्ते निवडून आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला .त्यानंतर प्राचार्य गणेश पाटील यांनी निवडून आलेल्या विद्यार्थ्यांना शपथ दिली .तसेच शाळेच्या प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना दिलेल्या शपथेचे महत्त्व सांगून तिचे पालन करणे कसे आवश्यक आहे आणि यातूनच विद्यार्थ्यांमध्ये असलेले नेतृत्वगुण कसे वाढीस लागतील हे सांगितले तर श्रीमती शोभा ताई पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून शाळेत शिकवल्या गेलेल्या या सगळ्या गोष्टी पुढील आयुष्यासाठी किती महत्त्वपूर्ण आहे हे सांगून निवडून आलेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अथर्व पाटील, शुघ्ना टेंबरे व वैभवी देशपांडे या विद्यार्थ्यांनी केले तर आभार प्रदर्शन गार्गी पाटील हिने केले या निवडणूक प्रक्रियेचे प्रमुख मंजुषा भिडे, मनोज भादुपोता, योगेश पाटील , अतुल मनोहर , सिद्धार्थ शिंदे, संतोष बडगुजर , निलेश बडगुजर हे होते. शाळेचे प्राचार्य गणेश पाटील व शाळेच्या समन्वयिका सौ संगीता तळेले यांचे मार्गदर्शन लाभले तर शाळेतील सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

Related Stories

No stories found.