चाळीसगाव:मानाच्या गणरायाची मिरणूक जल्लोषात

नेताजी पालकर चौक राजाचे मान्यवरासह हिन्दु-मुस्लीम बांधवानी घेतले दर्शन
चाळीसगाव:मानाच्या गणरायाची मिरणूक जल्लोषात

चाळीसगाव chalsigaon प्रतिनिधी

चाळीसगाव शहराचा मानाचा गणपती (Ganapati) असणारा नेताजी पालकर चौक गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाचे आज वाजत-गाजत परंपरे प्रमाणे भव्य मिरवणूक येथील मशीद समोरुन काढून स्वागत करण्यात आले.

कोरोनामुळेे (corona) बंद असलेल्या मिरवणूक यंदा मात्र मोठ्या उत्साहात काढण्यात आली. मशीद समोरुन मिरणूक काढण्याची नेताजी पालकर मंडळाची परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून असल्यामुळे या मिरणूकीला चाळीसगावात महत्व आहे. बुधवारी मानाचा गणपतीच्या मिरणुकीत सहभागी होवून खासदार उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण, माजी आमदार राजीव देशमुख यांच्यासह अनेक मान्यवरांंनी गणरायाचे दर्शन घेतले. तसेच मुस्लीम बांधवानी मिरणूक मशीद जवळ येताच, फुलांची उधळण करुन गणपती बाप्पांचे स्वागत केले. याप्रसंगी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. मिरणूकीत कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com