ऊर्जा साक्षरतेनेच पर्यावरण 'प्रदूषण' मुक्त - डॉ.चेतनसिंग सोलंकी

संत मुक्ताबाई महाविद्यालयात एनर्जी स्वराज यात्रेचे भव्य स्वागत
ऊर्जा साक्षरतेनेच पर्यावरण 'प्रदूषण' मुक्त  - डॉ.चेतनसिंग सोलंकी

मुक्ताईनगर Muktainagar (वार्ताहर) --

" ऊर्जेचा अवाजवी वापर सुरू असून यामुळे पारंपरिक ऊर्जास्रोत Conventional energy sources नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्मिती होत असल्याने आज जलवायू प्रदूषण Climate pollution ही विश्वाची समस्या झाली आहे.पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे. जागतिक तापमानात global temperatures वाढ होत आहे. त्यामुळे ऊर्जेचे सर्वात मोठे अस्तित्वाचे केंद्र असलेल्या सूर्यापासून ऊर्जानिर्मिती Energy from the sun करणे काळाची गरज आहे. परंतु सध्या ऊर्जेच्या वापराबद्दल मोठी निरक्षरता आहे.समाजात ऊर्जा साक्षरतेची Energy literacy गरज आहे. ऊर्जा साक्षरतेशिवाय प्रदूषणाच्या समस्येचे निराकरण शक्य नाही.त्यासाठी केवळ शासनावर अवलंबून न राहता सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. " असे प्रतिपादन एनर्जी स्वराज फाउंडेशनचे संचालक Director, Energy Swaraj Foundation चेतनसिंग सोलंकी Chetansingh Solanki यांनी मुक्ताईनगर येथे केले.

मुक्ताईनगर येथील संत मुक्ताबाई कला वाणिज्य महाविद्यालयात ऊर्जा साक्षरता अभियान अंतर्गत आलेल्या यात्रेप्रसंगी श्री.सोलंकी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संत मुक्ताबाई महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आय.डी. पाटील हे होते.

तर प्रमुख अतिथी म्हणून श्री.कच्छवा , प्रा. एल.बी.गायकवाड, संत मुक्ताबाई विद्यालयाचे मुख्याध्यापक एन.डी.काटे , किरण जायभाय , प्रकाश इस्ते , गजानन चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती याप्रसंगी मोठ्या प्रमाणात एनर्जी स्वराज फाउंडेशन यात्रेचे संत मुक्ताबाई महाविद्यालय भव्य स्वागत करण्यात आले

या प्रसंगी यात्रेचे प्रवर्तक चेतनसिंग सोलंकी यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्या माध्यमातून ऊर्जा बचत करणे तसेच अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा वापर करणे ऊर्जा साक्षरता या संदर्भात मार्गदर्शन केले ऊर्जाबचतीचा संदेश दिला त्यासोबतच आजही देशात शेकडा 99 लोक ऊर्जा निरक्षर आहेत. पारंपारिक ऊर्जा स्रोताच्या निर्मितीमुळे कार्बन-डाय-ऑक्साइडचे मोठ्या प्रमाणात पर्यावरणात वाढ होत आहे त्यासोबतच पर्यावरणाचे संतुलन बिघडत आहे त्यामुळे आज निसर्गचक्र बदलले आहे.विश्व जलवायू प्रदूषणाच्या विळख्यात सापडला आहे यातून बाहेर काढायचा असेल तर जलसाक्षरता हा एकमेव पर्याय असल्याचे विचार श्री. सोळंकी यांनी मांडले.
संत मुक्ताबाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, मुक्ताईनगर आणि एनर्जी स्वराज्य अभियान, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने “नैसर्गिक ऊर्जा काळाची गरज” या विषयावर एनर्जी स्वराज्यचे संचालक प्राध्यापक डॉ.चेतनसिंग सोलंकी यांनी विचार मांडले.

याप्रसंगी ते म्हणाले की, जागतिक लोकसंख्या वाढीमुळे ग्रीन हाऊस गॅस, जागतिक तापमान वाढ व ईतर अशा अनेक नैसर्गिक संकटांना दिवसेंदिवस तोंड द्यावे लागत आहे. पृथ्वीवरील नैसर्गिक साधन संपत्तीचा उत्तरोत्तर ऱ्हास होत आहे. परिणामी मानवी जीवनावर त्याचबरोबर नैसर्गिक संपत्तीवर विपरीत परिणाम होत आहेत. दिवसेंदिवस पृथ्वीचे औष्णिक तापमान मोठ्या प्रमाणात वाढत असून त्यामुळे सजीव सृष्टीला भविष्यात धोका निर्माण होत आहे. म्हणून निसर्गाचे संतुलन टिकविण्यासाठी व मानवी जीवन सुखी आणि संपन्न करण्यासाठी शाश्वत सौरऊर्जा वाचवण्यासाठी व त्यांचा कमीत कमी वापर हा एकमेव पर्याय आहे, असे प्रतिपादन याप्रसंगी त्यांनी केले.

भारतात मोठ्या प्रमाणात नैसर्गिक साधनसंपत्ती आणि खनिज संपत्ती उर्जा क्षेत्र मुबलक प्रमाणात उपलब्ध असून त्याला आपण कृत्रिम ऊर्जानिर्मितीकडे घेऊन जात आहोत. म्हणून दिवसेंदिवस मानव आणि प्राण्यांचे आयुष्य हे घटत चालले आहे. याकरिता समाजातील प्रत्येक घटकाने उर्जा जनजागृतीची चळवळ पुढे घेऊन जाणे काळाची गरज आहे. तरच वसुंधरेचे संरक्षण आपण करू शकू.
संपूर्ण भारतभर डॉ.चेतनसिंग सोलंकी यांनी एनर्जी स्वराज्य यात्रा आयोजित केलेली आहे. त्या निमित्ताने लोकजागृतीचे कार्य हे एनर्जी स्वराज्य यात्रेच्या माध्यमातून होण्याची अपेक्षा याप्रसंगी त्यांनी व्यक्त केली.
प्राचार्य डॉक्टर आय.डी. पाटील याप्रसंगी समारोपात म्हणाले की, सौर ऊर्जेचे महत्त्व पटवून देत असताना जल, जमीन आणि जंगल इत्यादी घटकांची ऊर्जा संवर्धनात खूप मोठी भूमिका आहे. पारंपरिक ऊर्जा नामशेष होण्याच्या मार्गावर असून आपल्याला अपारंपरिक ऊर्जेकडे जावे लागणार आहे.आणि Avoid, Minimize & Generate या त्रिसूत्री कार्यक्रमातून कमीत कमी ऊर्जाचा वापर करून पृथ्वीला येणाऱ्या मोठ्या संकटापासून वाचवायचे आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. स्नेहा वंजारी यांनी केले. तर आभार प्राध्यापक योगेश पाटील यांनी मानले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांना प्राध्यापक डॉ. संदीप माळी यांनी ऊर्जा बचतीची शपथ दिली. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे शैक्षणिक समन्वयक प्राध्यापक एल.बी. गायकवाड , सदस्य कच्छवा, संत मुक्ताबाई माध्यमिक विद्यालय तसेच महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी विद्यर्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com