केळीच्या सुकलेल्या पत्तीपासून साकारली पर्यावरण पुरक गणपतीची आरास

केळीच्या सुकलेल्या पत्तीपासून साकारली पर्यावरण पुरक गणपतीची आरास

फैजपूर - वार्ताहर Faizpur

गणपती (ganpati) किंवा गणेश म्हणजे गणांचा स्वामी गण म्हणजे समुदाय अथवा जमात ब्रह्मणस्पती या देवाला ऋग्वेदात 'गणपती' हे विशेषण असून हा हिंदू धर्मातील प्रथम बुद्धीचा अधिष्ठाता विघ्नचा नियंत्रक मानला जाणारा देव असून महाराष्ट्र राज्यात गणेशाची मोठ्या प्रमाणावर पूजा, उत्सव केले जातात, या गणेश उत्सवाचे औचित्य साधून एस.बी.चौधरी हायस्कूल, चांगदेव (Changdev) येथील कलाशिक्षक राजू साळी (Art teacher Raju Sali) यांच्या संकल्पनेतून केळीच्या (banana) सुकलेल्या खोडाच्या पत्ती पासून पर्यावरण पुरक नैसर्गिक सुंदर आरस तयार करण्यात आली असून गणपती सुद्धा पर्यावरण पूरक केलेला आहे.त्याचे रंगकाम स्वतः तयार करण्यात आलेले आहे.

मूर्ती हत्तीवर आरूढ झालेली असून मुख हत्तीचे दाखवण्यात आले आहेत, साळींनी बोलताना सांगितले की,केळीच्या सुकलेल्या पत्ती पासून पर्स, हँड बॅग, पॉट, किचन, पेन बॉक्स बॅग, पॉट अशा विविध शोभिवंत वस्तू बनवल्या जाऊ शकतात.आरस खूपच सुंदर असून कलात्मक रोषणाई करण्यात आली आहे.

सदर आरास बघण्यासाठी गर्दी होत आहे, राजू साळी यांच्या कडे विविध क्षेत्रातील लोकांना आरती साठी आमंत्रित केले जाते. आरस बघून राजू साळी सरांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com