रायपूर येथे पर्यावरणपूरक गणेशाचे विसर्जन

रायपूर येथे पर्यावरणपूरक गणेशाचे विसर्जन

रायपूर, (Raipur) ता. जळगाव-

येथील मयुरेश्‍वर स्कूलतर्फे शाडूमातीच्या गणेशमुर्तीची स्थापना करण्यात आली होती. आज घरीच पाण्याच्या टबमध्ये मुर्तीचे विसर्जन करुन जलप्रदुषण न करण्याची परंपरा जोपासली.

यावेळी चिमुकल्यांनी दाटला जरी कंठ तरी निरोप देतो तुला हर्षाने, माहीत आहे मला देवा पुन्हा येणार तू नववर्षाने या गाण्यवर नृत्य सादर करुन भावपूर्ण वातावरणात गणेशाचे विसर्जन करण्यात आले.

यावेळी विद्यार्थ्यांसह सौ.भारती परदेशी (मुख्याध्यापिका), सौ.सोनाली देसले, सौ. रुपाली पाटील, कु.दिशा दांडगे, तसेच गजेंद्र परदेशी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com