जामनेर शहरातील गांधी चौकावर अतिक्रमण धारकांचा ताबा

नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष ..नागरिक त्रस्त.
जामनेर च्या गांधी चौकातील अतिक्रमण
जामनेर च्या गांधी चौकातील अतिक्रमण

जामनेर Jamner प्रतिनिधी

शहरातील मुख्य बाजारपेठ ला जोडणारा नगरपालिका चौक (Nagarpalika Chowk) व गांधी चौकातील (Gandhi Chowk) मुख्य रस्त्यावर लोटगाडी वर भाजीपाला विक्रेत्यांनी अतिक्रमण (Encroachment) केले असून पूर्ण रस्त्यावर त्यांनी कब्जा मिळवला आहे. नगरपालिका प्रशासनाच्या छातीवर तसेच वाहतूक पोलीस (Traffic police) यंत्रणेच्या समोर हे अतिक्रमण धारक बिनधास्तपणे मुख्य रस्त्यावर भाजीपाल्याच्या लोटगाडी लावून वाहतुकीची कोंडी (Traffic jam) निर्माण करीत आहे .

यामुळे दिवसाढवळ्या अपघाताला आमंत्रण देण्याचा हा प्रकार असून नागरिकांना तसेच महिलांना या चौकातून जीव मुठीत घेऊन ये-जा करावी लागत आहे. वाहनधारकांना अगदी कसरत करून या ठिकाणाहून वाहन चालवावे लागतात. नगरपालिका प्रशासनाने या अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण काढून हा मुख्य रस्ता मोकळा करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

जामनेर शहरातील मुख्य बाजारपेठेतील हा रस्ता अनेक भागांना जोडणारा आहे शाळकरी मुलांपासून ते महाविद्यालयीन तरुणी तसेच महिला पुरुषांची या रस्त्यावरून सतत वर्दळ असते. दुचाकी वाहन चालक तसेच फोरविलर गाड्यांची ही या रस्त्यावर सतत वर्दळ असते .मात्र या रस्त्याच्या दुतर्फा मोठे शॉपिंग कॉम्प्लेक्स असून या कॉम्प्लेक्समध्ये ग्राहकांची नेहमीच वर्दळ असते .अशा या गजबजलेल्या मुख्य रस्त्यावर मात्र भाजीपाला विक्रेते तसेच फळ विक्रेते यांनी रस्त्याच्या मध्यभागी लोड गाडीवर दुकाने थाटून मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केले आहे.

हे अतिक्रमण शहरवासीयांसाठी डोकेदुखी ठरली असून मुख्य रस्त्यावरून पादचार्‍यांना ये जा करणे मुश्कील झाले आहे .दुचाकी व चारचाकी वाहन धारकांना नेहमीच वाहने चालविताना कसरत करावी लागते .अनेक वेळा या ठिकाणी अपघात ही घडून आले आहेत .या दोघी चौकामध्ये वाहतूक पोलिस बंदोबस्तासाठी असतात परंतु तेही हतबल झाले आहे . नगराध्यक्ष व नगरसेवक यांचे कुठे ना कुठे या भाजी पाला विक्रेत्यांची लागेबांधे असल्याने त्यांची नाराजी ओढवून घेतल्यास मतांवर परिणाम होईल या भीतीने पदाधिकारी डोळे उघडे ठेवून दुर्लक्ष करीत आहेत. नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी गेल्या तीन-चार महिन्यांपूर्वी पदभार स्वीकारला असून शहराच्या या गंभीर प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे स्पष्ट जाणवत आहे.

नगरपालिकेच्या समोर ब्युटी कॉम्प्लेक्स ला जोडणारा पाचोरा रोड वरील मुख्य रस्त्यावर मिनीडोअर मालवाहू रिक्षा बुलेरो अशा विविध मालवाहू गाड्या रस्त्यावर आपली वाहने उभी करून अतिक्रमण केले आहे या वाहनामुळे मुख्य रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी होत असून या वाहनांना इतर ठिकाणी मोकळ्या जागेत थांबा देऊन सदरचे अतिक्रमणे काढण्यात यावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे नगरपालिकेने शहरातील रस्ते रुंदीकरण केले परंतु या रुंदीकरणाचा लाभ शहरवासियांना न होता या अतिक्रमणधारकांना झाला असून त्यांनी या रस्त्यावर कब्जा मिळविला आहे तरी नगरपालिका प्रशासनाने त्वरित हे दोघे अतिक्रमण काढावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com