रोजगार वार्ता : भुसावळ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिल्प निदेशक पदासाठी भरती

रोजगार वार्ता : भुसावळ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिल्प निदेशक पदासाठी भरती

जळगाव - jalgaon

भुसावळ (Bhusawal) शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (Government Industrial Training Institute) शिल्प निदेशक पदावर सत्र २०२३-२४ या शैक्षणिक सत्रासाठी अभ्यागत शिक्षकांच्या तात्पुरत्या स्वरुपात नियुक्त्या करावयाची आहे. यासाठी २८ जुलै पर्यंत हस्ते पोहच अर्ज सादर करावेत. असे आवाहन भुसावळ ओद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

क्रॉफ्ट इन्स्ट्रक्चर-वेल्डर -१, क्रॉफ्ट इन्स्ट्रक्चर सिट मेटल वर्कर-२, क्रॉफ्ट इन्स्ट्रक्चर कोपा-१, क्रॉफ्ट इन्स्ट्रक्चर टर्नर-१, क्रॉफ्ट इन्स्ट्रक्चर फिटर-१, क्रॉफ्ट इन्स्ट्रक्चर इलेक्ट्रशियन-०३, क्रॉफ्ट इन्स्ट्रक्चर वायरमन-०३, मॅथ ॲण्ड ड्राईंग इन्स्ट्रक्चर-०१, एम्प्लोबिलिटी स्कील-०२ अशा पदांसाठी भरती केली जाणार आहे.

पदांकरीता शैक्षणिक पात्रता डायरेक्टोरेट जनरल ऑफ ट्रेनिंगने मान्यता दिलेल्या अभ्यासक्रमातील सबंधित व्यवसायाच्या ट्रेडनुसार आवश्यक आहे. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सर्व प्रमाणपत्रांच्या साक्षांकीत केलेल्या प्रतीसह २८ जुलै पर्यंत संस्थेच्या कार्यालयात हस्त पोहच सादर करावेत. मुलाखतीचे दिनांक व वेळ भ्रमणध्वनीद्वारे कळविण्यात येईल. उमेदवारांनी अर्जावर स्वत:चा भ्रमणध्वनी क्रमांक नोंदविणे आवश्यक आहे. उपलब्ध जागांमध्ये बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असेही प्राचार्यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com