धमक्यांना घाबरणार नसल्याचा कर्मचार्‍यांचा इशारा!
बस कर्मचारी digi

धमक्यांना घाबरणार नसल्याचा कर्मचार्‍यांचा इशारा!

जिल्ह्यातील 3500 एस.टी. कर्मचारी विलीनीकरणावर ठाम

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

विलीनकरणाच्या मागणीवरून (Demand for merger) संपावर असलेल्या एसटी कर्मचार्‍यांना (ST workers on strike) कामावर परतण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी आवाहन केले होते. मात्र या आवाहन वजा धमकीला दुखवट्यात असलेले एसटी कर्मचारी घाबरणार नसल्याचा इशारा कर्मचारी प्रतिनीधी शैलेश नन्नवरे यांनी दिला. दरम्यान कर्मचारी विलीनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम असल्याचेही त्यांनी सांगितले.

विलीनीकरणाच्या मागणीवरून (Demand for merger) राज्यातील एसटी कर्मचारी गत 100 दिवसांपासून संपावर (strike) आहेत. सुरूवातीला या संपात राज्यातील जवळपास 92 हजार कर्मचारी सहभागी होते. मात्र महाविकास आघाडी सरकारकडुन (Mahavikas Aghadi government) होत असलेल्या कारवाईच्या भितीपोटी 32 हजार कर्मचारी कामावर परतले आहे. 60 हजार कर्मचारी अजूनही संपात (strike) सहभागी आहेत. विलीनकरणाच्या या मुद्द्यावरून राज्यासह जळगाव जिल्ह्यातील काही कर्मचार्‍यांनी आपली जीवनयात्रा संपविली. त्या निषेधार्थ एसटी कर्मचारी संप नव्हे तर दुखवटा पाळत असल्याची माहिती जळगाव आगारातील वाहनचालक शैलेश नन्नवरे यांनी दिली. एस.टी. कर्मचार्‍यांचा प्रश्न तातडीने सोडविण्याची विरोधी पक्षांनी (opposition) मागणी केली आहे. मात्र हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने सरकारनेही अद्याप कुठलाही निर्णय घेतला नाही.

विलीनीकरणाच्या मुद्यावर

कर्मचारी ठामच

राज्यातील काही एसटी कर्मचारी (ST workers) घाबरून कामावर परतले असले तरी आम्ही धमक्यांना घाबरणार नसल्याचे वाहनचालक शैलेश नन्नवरे यांनी सांगितले. तसेच येत्या 5 एप्रिल रोजी उच्च न्यायालयात (High Court) सुनावणी असुन जोपर्यंत आमचे वकील अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते सांगत नाही तोपर्यंत आम्ही दुखवटाच करू. तसेच जिल्ह्यातील 3500 कर्मचारी विलीनीकरणाच्या मुद्यावर ठाम असल्याचेही नन्नवरे यांनी सांगितले.

...अन्यथा कडक कारवाई

नुकतेच अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडले. या अधिवेशनकाळात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी एस. टी. कर्मचार्‍यांनी दि. 31 मार्चपर्यंत कामावर परतण्याचे आवाहन केले. तसेच कामावर न परतल्यास कठोर भूमिका घेण्याचा इशाराही दिला आहे.

Related Stories

No stories found.