बीएचआर घोटाळा : ‘त्या’ 11 जणांनी दुसर्‍या टप्प्यातील रक्कम भरली

बीएचआर घोटाळा : ‘त्या’ 11 जणांनी दुसर्‍या टप्प्यातील रक्कम भरली

पुणे न्यायालयात कामकाजावेळी संशयित होते हजर

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

बीएचआर घोटाळ्यातील (BHR scams) बड्या उद्योजकांसह अकरा संशयितांना (suspects) न्यायालयाने (court) 23 ऑक्टोबरपर्यंत अंतरिम जामीन (Interim bail) वाढवून दिला आहे. या सर्व संशयितांनी ठरल्याप्रमाणे न्यायालयात दुसर्‍या हप्त्याची रक्कम (Amount) देखील जमा केली असल्याची माहिती विशेष सरकारी वकील अँड. प्रवीण चव्हाण (Lawyer Praveen Chavan) यांनी दिली आहे.

11 संशयित आरोपीपैकी गुरुवारी पुणे विशेष न्यायालयातील एस.एस. गोसावी यांच्या कोर्टात बहुतांश आरोपींनी हजेरी लावली होती. सकाळी 11 वाजेपासून सर्व जण न्यायालयात हजर होते.

भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट कॉ ऑप क्रेडीट सोसायटीत गैरकारभार तसेच फसणुकीबाबत फिर्यादी रंजना खंडेराव घोरपडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पुणे येथील डेक्कन पोलीस ठाण्यात भादंवि कलम 420, 464, 465, 468,471,474,120 ब, 34 सह एमपीआयडी ऍक्ट कलम 3 अन्वये 24 नोव्हेंबर 2020 रोजी गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात पुणे आर्थिक गुन्हे शाखेने 17 जून रोजी जळगाव जिल्ह्यातील भागवत भंगाळे, प्रेम नारायण कोगटा, संजय तोतला तिन्ही रा. जळगाव, जयश्री शैलेश मणीयार रा. पाळधी, जयश्री अंतिम तोतला रा. मुंबई, जितेंद्र रमेश पाटील रा. जामनेर, आसिफ मुन्ना तेली रा. भुसावळ, छगन शामराव झाल्टे रा. जामनेर, राजेश शांतीलाल लोढा रा. तळेगाव ता. जामनेर, यांच्यासह प्रितेश चंपालाल जैन रा. धुळे, अंबादास आबाजी मानकापे रा. औरंगाबाद या 11 जणांना अटक केली होती.

या 11 संशयितांना पुणे विशेष न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर करतांना संशयितांना मॅच केलेल्या पावत्यांची एकूण 20 टक्के रक्कम भरण्याची प्रमुख अट घातली होती. त्यानुसार सर्व संशयितांनी त्यावेळी न्यायालयात एकूण 3 कोटी 13 लाख 17 हजार 683 रुपये भरले होते.सर्व संशयितांनी जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. सुनावणी होऊन विशेष न्यायालयाने त्यांना प्रत्येकी एक लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला होता. त्यानुसार 15 ऑक्टोबर 2021 पर्यंत परतफेड करायच्या 40 टक्के रकमेपैकी 20 टक्के रक्कम 10 दिवसांत जमा करण्याची प्रमुख अट होती. या अटींनुसार सर्वांनी पैसे भरले होते.असे भरले संशयितांनी पैसे

जयश्री तोतला (29 लाख 33 हजार 594 रुपये), अंबादास मानकापे (54 लाख 23 हजार 328 रुपये), संजय तोतला (20 लाख 58 हजार 734 रुपये), राजेश लोढा (26 लाख 28 हजार912 रुपये), आसिफ तेली (22 लाख 42 हजार 425 रुपये), जयश्री मणियार (17 लाख 93 हजार 412 रुपये), प्रीतेश जैन (30 लाख 21 हजार 990 रुपये), छगन झाल्टे (34 लाख 35 हजार 998 रुपये), जितेंद्र पाटील (13 लाख 51 हजार 290 रुपये), भागवत भंगाळे (21 लाख 8 हजार), प्रेमनारायण कोकटा (43 लाख 20 हजार), असे सर्व संशयितांनी न्यायालयात एकूण 3 कोटी 13 लाख 17 हजार 683 रुपये भरले होते.दरम्यान, बुधवार आणि गुरुवार या दोन दिवसात पुन्हा या संशयितांनी ठरल्याप्रमाणे दुसरा हप्ता भरला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com