
सावदा Savada प्रतिनिधी
स्थानिक व परिसरात भागात मीटर (Electricity meters) मध्ये फेरफार करून वीजचोरी करणाऱ्यांविरुद्ध सावदा उपविभागाने धडक कारवाई सुरू केली आहे. गेल्या आठवड्याभरात अशा ५५ ग्राहकांची (consumers) वीज जोडणी कापून मीटर जप्त (seized) करण्यात आले आहे . तसेच वीज चोरांविरुद्ध विविध कलमानव्ये दंडात्मक कारवाई केली आहे. या कारवाईने वीजचोरी (Electricity theft) करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
मुख्य कार्यालयाने राबवलेल्या धोरणानुसार ज्या ज्या वीजवाहिनीवर जास्त विजेची हानी होत आहे अशा ठिकाणी महावितरणच्या वतीने कार्यकारी अभियंता गोरक्षनाथ सपकाळे यांचे आदेशानुसार व उपकार्यकारी अभियंता श्री राजेश नेमाडे यांचे मार्गदर्शनाखाली पथक स्थापन करून वीजचोरांविरोधात मोहीम उघडण्यात आली आहे.
या मोहिमेत प्रामुख्याने ० ते ५० युनिट पेक्षा कमी वापर असलेले एकूण २८५ ग्राहकांच्या मिटरची कसून तपासणी करण्यात आली असून फेरफार असलेले ५५ मीटर जप्त करण्यात आले व सदरील ग्राहकांची वीज जोडणी कापण्यात आली आहे .घरगुती , व्यावसायिक, औद्योगिक व सर्व प्रकारच्या वर्गवारीतील नागरिकांनी कोणत्याही प्रकारची वीज चोरी करू नये, अन्यथा संबंधितांवर वीज कायद्यानुसार दंडात्मक कार्यवाही करण्यात येणार असल्याचे आवाहन उप कार्यकारी अभियंता राजेश नेमाडे यांनी केले आहे.
दरम्यान , विद्युत कायद्यानुसार शेजाऱ्याकडून अनधिकृतपणे विज घेणे , मंजुर भारपेक्षा अधिक क्षमतेचा भार वापरणे, मंजूर वर्गवारीतून दुसऱ्या वर्गवारीसाठी अनधिकृतपणे विजेचा वापर करणे,मीटर मध्ये छेडछाड, आकोडे टाकून विज घेणे, सर्विस वायर बायपास करणे असे प्रकार आढळल्यास कारवाई केली जाते.कुठेही विजेचा अनधिकृतपणे वापर किंवा चोरी होत असल्याचे आढळल्यास कारवाई करा असे आदेश उपकार्यकारी अभियंता राजेश नेमाडे यांनी दिले आहे.
पथकात यांचा होता सहभाग
वीज चोरी विरोधी धडक मोहीम पथकात सहाय्यक अभियंता विशाल किनगे, योजना चौधरी,हेमंत चौधरी, योगेश चौधरी, सागर डोळे, मंगेश यादव , सचिन गुळवे, प्रसन्न साळुंखे , भूषण पाटील आदी सहभागी होते.
खालील प्रमाणे झाली कारवाई
चिनावल ०६, दसनूर 0५ , आंदलवाडी ०४, खिरोदा ९, कोचुर ०२ , मस्कावद ०४, निंभोरा ११, सावदा शहर ७ , उधळी ०७