यावल तालुक्यात आठ ग्रामपंचायतीच्या निवडणूकांचा वाजला बिगुल

यावल तालुक्यात आठ ग्रामपंचायतीच्या निवडणूकांचा वाजला बिगुल

यावल Yaval प्रतिविधी

डिसेंबर २०२२ मध्ये तालुक्यातील मुदत संपत (Expired) असलेल्या आठ ग्रामपंचायतीच्या (Gram Panchayat) लोकनियुक्त सरपंचांसह (Public Appointed Sarpanch) सदस्य (members)पदाच्या पंचवार्षिक सार्वत्रीक निवडणुकी (Elections) या डिसेंबर मध्ये होत असून, त्यासाठी निवडणूक आयोगाकडून (Election Commission) निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. 

यावल तालुक्यात आठ ग्रामपंचायतीच्या निवडणूकांचा वाजला बिगुल
चाळीसगाव तालुक्यात 16 ग्रामपंचायतीच्या निवडणुका रंगणार

 सर्वोच्च न्यायलयाच्या विशेष अनुमती २०२१च्या संलग्न याचिकांमध्ये दि. ४ / ५ / २०२२ च्या अंतरिम आदेशामध्ये १० / ३ / २०२२ रोजीच्या टप्प्यापासुन पुढील प्रक्रीया पुर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. 

  त्या अनुसार आयोगाच्या दि. ६ / ५ / २०२२ दिनांक ३० / ५ / २०२२ दि. ०३ / ६ / २०२२ प्रभाग रचना पुर्ण करण्यात आली असुन ,यावल तालुक्यातील आठ ग्रामपंचायती   अंतर्गत होवु घातलेल्या पंचवार्षीक सार्वत्रीक निवडणुकीसाठी या गावांचा समावेश आहे.     

यावल तालुक्यात आठ ग्रामपंचायतीच्या निवडणूकांचा वाजला बिगुल
मोबाईलने केला घात : भरधाव ट्रक झाडावर आदळून चालक झाला ठार
यावल तालुक्यात आठ ग्रामपंचायतीच्या निवडणूकांचा वाजला बिगुल
रावेर तालुक्यात मुदत संपलेल्या २२ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची रणधुमाळी 

यावल तालुक्यातील दि. १८ / ११ / २०२२ शुक्रवार पासुन या संपुर्ण निवडणुकीच्या प्रक्रीयेस सुरुवात होणार असुन , दि. १८ /१२ / २०२२ रविवार रोजी या निवडणुकी साठी मतदान होणार असुन  या निवडणुकीत सर्व राजकीय पक्षाच्या दृष्टीने सर्वांचे लक्ष वेधणारी न्हावी प्रगणे या सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीसह तालुक्यातील चुंचाळे , पिळोदे बुद्रुक ,पाडळसे, चिखली खुर्द ,चिखली बुद्रुक, कासारखेडे, चितोडा या गावांच्या ग्रामपंचायतीचा या निवडणुकीत समावेश आहे.

दरम्यान निवडणुकीचे कार्यक्रम जवळ येणार असल्याची पुर्वकल्पना असल्याने गावपातळीवर राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे.

यावल तालुक्यात आठ ग्रामपंचायतीच्या निवडणूकांचा वाजला बिगुल
पत्नीचा खून करणार्‍या पतीस जन्मठेप
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com