
चाळीसगाव Chalsigaon प्रतिनिधी
सभासदांना केंद्रबिंदू मानून आणि सभासदांचे हित जोपासत संस्थेची प्रगती उंचावली असून संस्थेने सतत लाभांश वाटप करून सभासदांचा विश्वास संपादन केला आहे. कार्यपद्धतीत पारदर्शकता व सचोटी असल्यानेच गेल्या १०० वर्षांपासून या सोसायटीची निवडणूक बिनविरोध झाली होती. (North Maharashtra) उत्तर महाराष्ट्रात अग्रगण्य स्थानी असलेली चाळीसगाव विविध कार्यकारी सोसायटी ही संपूर्ण राज्यात नावलौकिकास पात्र ठरली आहे, हे संस्थेच्या प्रगतीचे द्योतकच म्हणावे लागेल. परंतू काही विघ्नसंतोषी लोकांनी स्वता;च्या आर्थिक फायद्यासाठी संस्थेवर निवडणुक (Election) लादली असल्याचा घणाघात जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप देशमुख यांनी केला.
शेतकरी सहकार पॅनलच्या वतीने शहरातील कपिलेश्वर महादेव मंदिरावर नारळ वाहण्यात आले. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, बाजार समितीचे माजी सभापती रोहिदास पाटील, माजी उपसभापती महेंद्र पाटील, जिल्हा दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील, चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बाळासाहेब चव्हाण, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिल निकम, चाळीसगाव सोसायटीचे माजी अध्यक्ष प्रदीप देशमुख यांनी संस्थेच्या कार्यपद्धती व कारभाराबाबत माहिती विशद केली
याप्रसंगी माजी आमदार राजीव देशमुख, डॉ नरेश देशमुख, डॉ संजय देशमुख, माजी आमदार ईश्वर जाधव, भीमराव खलाणे, शामलाल कुमावत, अजय पाटील, अजय देशमुख, शिवाजी आमले, ईश्वर ठाकरे, प्रदीप अहिरराव, कल्याण पाटील, सतीश महाजन, भगवान पाटील, रोशन जाधव, अनिल जाधव, रवींद्र चौधरी, रामचंद्र जाधव, सदाशिव गवळी, रामकृष्ण पवार, प्रदीप राजपूत, बाबूलाल पवार, विठ्ठल शिंगाडे, रवींद्र जाधव, रमेश शिंपी, प्रकाश देशमुख, जीभाऊ पाटील, भास्करराव चव्हाण, सुरेश वाघ, सिद्धार्थ देशमुख, मिलिंद शेलार, काशिनाथ गवळी, दिपक राजपूत, योगेश पाटील, राजेंद्र मोरे, भाऊसाहेब पाटील, खुशाल पाटील, राजीव जाट, संजय कापसे, पप्पु राजपूत आदी उपस्थित होते.