कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक रद्द

खंडपीठाचा आदेश; जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवाई यांची माहिती
कृषी उत्पन्न बाजार समिती jalgaon
कृषी उत्पन्न बाजार समिती jalgaon

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

जिल्ह्यात सुरू असलेल्या बाजार समित्यांची (market committees) निवडणूक प्रक्रिया (Election process) रद्द (canceled) झालेली असून विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या निवडणुकीनंतर निवडणुकीस पात्र कृषी उत्पन्न बाजार समितीची (Agricultural Produce Market Committee)निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यासंदर्भात राज्य सहकारी निवडणूक प्राधिकारणाकडून (State Co-operative Electoral Authority) आदेश पारीत झाल्यानंतरच बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक (District Deputy Registrar) जळगाव यांनी दिली आहे.

जळगाव जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पाचोरा, चाळीसगाव, पारोळा, अमळनेर, चोपडा व रावेर यांच्या मतदारांची मतदार यांदी अंतिम करण्याची प्रक्रिया सुरू होती. तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती जळगाव, भुसावळ, बोदवड, जामनेर, धरणगाव व यावल या बाजार समित्यांना मतदारांची प्राथमिक व तात्पुरती मतदार यादी सादर करण्याबाबत या कार्यालयामार्फत कळविण्यात आले होते. त्यानुसार मतदार यादीचे काम सुरु होते. यावेळी निवडणुकीला स्थगिती मिळावी यासाठी लातूर व उस्मानाबाद येथील ग्रामपंचायत सदस्यांनी खंडपीठात याचिका दाखल केली होती.

खंडपीठाने दि. 18 नोव्हेंबर रोजी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या निवडणुकीनंतर निवडणुकीस पात्र कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सुरू करावी, असा आदेश दिले आहे. त्यानुसार राज्य सहकारी निवडणुक प्राधिकरणाने दि. 22 नोव्हेंबर रोजीच्या आदेशानुसार प्राधिकरणाकडील 6 व 21 ऑक्टोबर रोजीचे आदेश रद्द करण्यात आले आहेत. या आदेशानुसार कृषी उत्पन्न बाजार समिती मतदार यादीवर आक्षेप व हरकती मागविण्याची प्रक्रिया राबवलेली आहे ती प्रकिया रद्द करण्यात आलेली आहे.

पुढील आदेश येईपर्यंत करावी लागणार प्रतिक्षा

खंडपीठाने दिलेल्या आदेशामुळे जिल्ह्यात सुरू असलेल्या बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रिया रद्द झाली आहे. तसेच विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या निवडणुकीनंतर निवडणुकीस पात्र कृषी उत्पन्न बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रिया सुरु करण्यासंदर्भात राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण यांच्याकडून आदेश पारीत झाल्यांनतरच बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रिया सुरू होणार असल्याने तो पर्यंत कृउबातील सदस्यांना आदेशाची प्रतिक्षा करावी लागणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com