24 ग्रामपंचायतींची निवडणूक

12 जुलैपासून प्रक्रियेला सुरूवात
24 ग्रामपंचायतींची निवडणूक

जळगाव । Jalgaon

राज्यातील 271 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने बुधवारी जाहीर केला आहे. यात जळगाव जिल्ह्यातील 24 ग्रामपंचायतींचा समावेश असून दि. 4 ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे.

माहे जानेवारी 2021 ते मे 2022 व जून 2022 ते सप्टेंबर 2022 या कालावधीत मुदत संपलेल्या आणि नव्याने स्थापित झालेल्या अशा 271 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने बुधवारी जाहीर केला आहे. यात जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील 12, अमळनेर - 1, एरंडोल - 2, पारोळा - 3 आणि चाळीसगाव - 6 अशा एकूण 24 ग्रामपंचायतींचाही समावेश आहे.

असा आहे निवडणूक कार्यक्रम

नामनिर्देशन पत्र दाखल करणे - दि. 12 ते 17 जुलै, स. 11 ते दु. 3 (सुटीचे दिवस वगळून), नामनिर्देशन पत्रांची छाननी दि. 20 जुलै रोजी स. 11 वाजेपासून, नामनिर्देशन पत्रांची माघार दि. 22 जुलै दु. 3 वाजेपर्यंत, अंतीम उमेदवारांची यादी प्रसिध्दी व चिन्ह वाटप दि. 22 जुलै, मतदान 4 ऑगस्ट रोजी स. 7.30 ते 5.30, मतमोजणी 5 ऑगस्ट.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com