घाडवेल येथील वयोवृद्ध महिला बेपत्ता

घाडवेल येथील वयोवृद्ध महिला बेपत्ता

चोपडा Chopada प्रतिनिधी
   घाडवेल (ता.चोपडा) येथील रहिवाशी शांताबाई रमन पाटील (Shantabai Raman Patil) (वय-७२) ही वयोवृद्ध (Elderly women) महिला दि.२ नोव्हेंबर रोजी सकाळी ९:३० वाजता घाडवेल शिवारातील (Ghadvel Shiwar) शेतात जाऊन येते (going to the farm) असे सांगून  राहत्या घरातून निघून (Gone) गेल्या आहेत.त्यानंतर कुटुंबियांनी व नातेवाईकांनी वयोवृद्ध महिलेचा अनेक ठिकाणी शोध घेतला परंतु त्या कुठेही आढळून आल्या नाहीत.याबाबत ग्रामीण पोलीस स्टेशनला मिसिंगची नोंद (missing) करण्यात आली आहे.

  घाडवेल (ता.चोपडा) येथील रहिवाशी रमन छन्नु पाटील यांच्या धर्मपत्नी शांताबाई रमन पाटील (वय-७२) ही वयोवृद्ध महिला दि.२ नोव्हेंबर रोजी सकाळी ९:३० वाजता शेतात जाऊन येते असे सांगून गेल्या परंतु संध्याकाळ झाली तरी अद्याप घरी आलेल्या नाहीत असे रमन छन्नु पाटील यांनी लहानभाऊ साहेबराव छन्नु पाटील यांना सांगितले.

त्यानंतर संध्याकाळी कुटुंबियांनी शेतात जाऊन चौकशी केली असता त्या शेतात दिसून आल्या नाहीत तसेच चोपडा,शिरपूर,अमळनेर,जळगाव आदी ठिकाणी नातेवाईकांकडे जाऊन शोध घेतला मात्र शांताबाई रमन पाटील कुठेच आढळून आल्या नाहीत.

त्यांचा चेहरा उभट,नाक सरळ,रंग गोरा,केस काळे पांढरे लांब,डोळे काळे, डोळ्यावर चष्मा,गळ्यात काळी व पिवळे धातुची पोत,चेहऱ्यावर तोंडाजवळ डाव्या बाजूस मस, डाव्या हाताच्या भुजेवर पिवळ्या धातुचे कडे, कानात पिवळ्या धातुच्या रिंगा व साखळ्या, अंगात पांढऱ्या रंगाची साडी व त्यावर लाल,हिरवी डिझाइन असलेली तसेच त्यांना भाषा आहिराणी, व गुर्जर भाषा येतात.

     याबाबत साहेबराव छन्नु पाटील (वय-६५) धंदा-शेती रा.घाडवेल (ता.चोपडा) यांनी दिलेल्या माहिती वरून शांताबाई रमन पाटील या वयोवृद्ध महिला बेपत्ता झाल्याची मिसिंगची नोंद ग्रामीण पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे.तपास सपोनि.संदीप दुनगुहे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ.भरत नाईक करीत आहेत. वरील वर्णनाची वयोवृद्ध बेपत्ता महिला कोणास आढळून आल्यास ग्रामीण पोलीस स्टेशन चोपडा यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com