ट्रक-कारच्या विचित्र अपघातात वृद्ध महिलेचा मृत्यू

ट्रक-कारच्या विचित्र अपघातात वृद्ध महिलेचा मृत्यू

चाळीसगाव Chalisgaon

औरंगाबाद महामार्ग वरील कन्नड घाटात (Kannada Ghat) उभ्या असलेल्या कारवर ट्रक (Truck over car)येऊन धडकल्याने, झालेल्या विचित्र अपघातात (accident) वृद्ध महिलेचा मृत्यू (death) झाला असून तीन जण जखमी झाले आहे. घटनास्थळावरून ट्रक चालकाने पलायन केले असून याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला रात्री उशिरापर्यंत कुठल्याही प्रकारची नोंद नव्हती.

कन्नड घाटातून तीन्ही गाड्या औरंगाबाद वरून धुळ्याकडे जात होत्या, घाटातील सरदार पाॅईटवर ट्रक क्र Gj36, V7852 ही उभी राहीली, त्याच्या मागून मारूती बलेनो क्र. MH20, EE5470  ही गाडी येऊन उभी राहीली, आणि तिच्याच मागून  क्र. TN36, AW3999 ट्रक जोरात येऊन बलेनो कार येवढ्या जोरात आदळली की, बलेनो पुढे उभ्या असलेल्या ट्रक खाली घुसली, त्यात कार मधील यमुनाबाई पवार (वय 68) यांचा जागीच मृत्यू झाला,  लहान मुलगी गौरी गव्हाणे (वय9) सुखरूप असून जखमी अश्वीनी गव्हाणे (वय 30) व कृष्णा गव्हाणे चालक (वय 66) हे जखमी असून त्यांना उपचारासाठी होणारा दाखल केले आहे, जखमींना कुठल्याही प्रकारची मदत न करता ट्रक चालकाने घटनास्थळावरून पलायन केले आहे.

अपघाताची माहीती मिळताच महामार्ग पोलीस केद्रावरील API रूपाली पाटील, पो.हा. योगेश बेलदार, विरेंद्रसिंग सिसोदे,धनंजय सोनवणे, इशांत तडली हयांनी तात्काल घटनास्थळी घेऊन, गाडीत फसलेले जखमीं यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला कुठल्याही प्रकारची नोंद नव्हती.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com