एकनाथराव खडसेंचा अखेर विधान परिषदेत प्रवेश

राष्ट्रवादीने केला भाजपाचा करेक्ट कार्यक्रम
एकनाथराव खडसेंचा अखेर विधान परिषदेत प्रवेश

जळगाव jalgaon

आयुष्याची 45 वर्ष भाजपाच्या (Bjp) वाढीसाठी घालवलेल्या एकनाथराव खडसे (Eknathrao Khadse) यांचा विधान परिषदेतील (Legislative Council) प्रवेश रोखण्यासाठी भाजपाने जंग जंग पछाडले. राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत (list of MLAs appointed by the Governor) केवळ खडसे यांचे नाव असल्याने ही यादीच नाकारण्यात आली. मात्र श्री. खडसे यांचे राजकीय पुनर्वसन (Political rehabilitation) करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनेही (Nationalist Congress) कंबर कसली आणि भाजपाचा करेक्ट कार्यक्रम (BJP's correct program) करत एकनाथराव खडसे यांचा आजच्या निवडणुकीत विजय घडवून आणत विधान परिषदेत त्यांचा प्रवेश कायम (finally enters) केला.

गत वर्षापासून राजकीय विजनवासात असलेल्या श्री. खडसे यांची विधानपरिषदेच्या निवडणूकीत झालेल्या विजयाने जळगाव जिल्ह्याच्या राजकारणाला नवी कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. राजकारणात कोणी कोणाचा मित्र नसतो हे भाजपा आमदार राजु भोळे यांनी सांगितले होते. त्यामुळे श्री. खडसे यांच्या विजयामुळे त्यांचे माजी सहकारी असलेले माजी पालकमंत्री व संकटमोचन आ. गिरीशभाऊ महाजन यांच्या भूमिकेकडे आता लक्ष लागले आहे.

संकटमोचन म्हणून ओळखले जाणारे भाजपचे माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यासह माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यात दुरावा आहे. त्यामुळे एकनाथराव खडसे यांना भाजपात वाळीत टाकले होते. अखेरीस श्री. खडसे यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीची वाट धरली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकनाथ खडसे यांना विधानपरिषदेची उमेदवारी देवून मैदानात उतरवले. पाचव्या उमेदवारासाठी खरी लढत काँग्रेस व भाजपत होती. परंतु विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांचा खरा निशाना एकनाथराव खडसे होते. एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील वाद संपूर्ण राज्याला माहिती आहे.श्री. फडणवीस यांचे विश्वासू म्हणून श्री. महाजन परिचीत आहेत. त्यातच श्री. खडसे यांचे जिल्ह्यातील वर्चस्व महाजनांनाही नको आहे. राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत केवळ खडसे यांचे नाव असल्याने ही यादीच नाकारण्यात आली.

कोणत्याही परिस्थितीत त्यांचा विजय होऊ नये, म्हणून सर्व प्रयत्न या दोन्ही नेत्यांकडून करण्यात आले. आगामी काळात भाजपला खडसे अडचणीचे ठरणार आहेत. त्यामुळे भाजप आणि महाजन खडसे यांना पराभूत करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. 45 वर्षाचा राजकीय अनुभव या ताकदीवर खडसे आपला विजय संपादन केला.सर्वाधिक 29 मते घेऊन खडसे विजयी झाले.

खडसे यांना सर्वाधिक मते

राष्ट्रवादीत गेल्यानंतर खडसे यांनी सातत्याने देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यांवर टीका केली. या दोघांनीही खडसे यांचे खच्चीकरण करण्याचे एकही संधी सोडली नाही. खडसे यांच्या मागे ईडीची चौकशी लावली. त्यांच्या पत्नी मंदाताई खडसे यांनाही चौकशीसाठी बोलवण्यात आले. त्यांची संपत्ती ईडीने जप्त केली. यामुळे खडसे विरुद्ध महाजन आणि फडणवीस असा सामना नेहमीच राज्यात दिसून आला. आता खडसे यांना पराभूत करण्याची रणनीती आखण्यात आली होती. पक्षाला पाच जागा मिळवून देण्यात फडणवीस यांना यश आले तरी खडसे यांचा पराभव करण्याचे त्याचे मनसुबे धुळीला मिळाले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com