फोटो व्हायरलची धमकी देत तरुणीवर आठ वर्ष अत्याचार

फोटो व्हायरलची धमकी देत तरुणीवर आठ वर्ष अत्याचार

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

शहरातील 22 वर्षीय तरुणी (young woman) शाळेत शिकत असतांना तेव्हा पासून त्या तरुणीचे फोटो व्हायरल (photo viral) करण्याची धमकी (threatening) देत आठ वर्ष सलग तिच्यावर अत्याचार (Tyranny) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सात जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भुसावळातील 22 वर्षीय तरूणी सध्या जळगाव शहरातील एका भागात वास्तव्यास आहे. ही तरुणी 14 वर्षांची असतांना ती भुसावळातील एका शाळेत शिक्षण घेत होती. यावेळी भुसावळातील रितेश सुनील बाविस्कर (Ritesh Sunil Baviskar) याची त्या तरुणीसोबत ओळख झाली. या तरुणाने शाळेत होणार्‍या विविध कार्यक्रमांच्या वेळी त्या तरुणीचे मॉपिंग (Mapping) केलेले अश्लिल फोटो व व्हिडीओ (Pornographic photos and videos) काढले आणि त्या तरुणीला दाखविले. हे व्हिडीओ दाखवित त्या तरुणीला मी तुला जसे सांगेन तसे कर नाही तर तुझे फोटो सोशल मीडियात व्हायरल (photo viral) करण्याची धमकी देखील दिली. त्यानंतर आठ वर्षांपुर्वी त्या तरुणी अल्पवयीन असतांना रितेश बाविस्कर याच्यासह त्याचा मित्र बंटी आणि राहुल यांनी त्या तरुणीला जबरदस्तीने गाडीवर बसवून तिला इंजिनघाट परिसरात नेवून तिच्यावर अत्याचार (Tyranny) केला. यावेळी या घटनेचे बंटी आणि राहुल यांनी फोटो आणि व्हिडीओ देखील काढले होते.

घरातून चोरुन आणायला लावायचे पैसे

रितेश याने अत्याचार केल्यानंतर त्या तरुणीच्या हातातील सोन्याची अंगठी काढून घेतली. त्यानंतर तिला पुन्हा शाळेजवळ आणून सोडले. यावेळी रितेश सांगितले की, तू जर कोणाला काही सांगितले तर तुझे फोटो व्हायरल करेल अशी धमकी दिली. त्यानंतर काही दिवसांनी रितेशची आई शोभा बाविस्कर आणि बहीण नंदिनी राहुल काळे या दोघांनी फोटो व्हायरल करण्याची धमकी देत घरातून तरुणीला पैसे चोरुन (Stealing money) आणण्यास सांगितले. रितेशच्या बहिणीचे लग्न असतांना रितेश, नंदिनी, उर्वेश व सुनिल यांनी त्या तरुणीच्या गळ्यातील 7 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन काढून घेत नंदिनीच्या गळ्यात घातली. तसेच नंदिनीच्या लग्नसाठी तरुणीला धमकी देवून तिच्याकडे पैशांची मागणी केली. त्यानुसार त्या तरुणीने वडीलांना व भावाला कॉलेजची फि च्या नावाखाली पैसे मागितले आणि ते रितेशला दिले. त्या तरुणीवर रितेश बाविस्कर याने त्याच्या घरी, यावल येथील बोरावलतील कठोरा येथे तर जळगावातील जैनाबाद परिसरासह दि. 21 मार्च रोजी नोकरीचा इंटरव्युव करीता मुंबईला बोलावून याठिकाणी तरुणीवर अत्याचार (Tyranny) केला.

संशयिताच्या आई, वडील, बहिणीसह गुन्हा

आठ वर्षांपासून होणार्‍या छळाला व अत्याचाराला कंटाळून तरुणीने सोमवारी शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी रितेश सुनील बाविस्कर, त्याची आई शोभा सुनील बाविस्कर, त्याची बहीण नंदनी राहुल कोळी, त्याचे वडील सुनील बाविस्कर सर्व रा. भुसावळ, मित्र उर्वेश पाटील बंटी आणि राहुल (पुर्ण नाव माहित नाही) अशा 7 जणांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अरुण सोनार करीत आहेत.

लग्न न केल्यास भावाला

मारुन टाकण्याची धमकी

हा प्रकार तरुणीसोबत ती अल्पवयीन असतांना गेल्या सात ते आठ वर्षांपासून सुरू होता. ती तरुणी22 वर्षाची झाली असताना तिच्या नातेवाईकांनी तिचा लग्नाचा विषय सुरू केला. हा विषय रितेश समजल्यानंतर त्याने दि. 19 एप्रिल रोजी तरुणीला कॉलेजमधून गाडीवर बसून घेऊन बिग बाजार येथे जळगावला आणले. या ठिकाणी देखील तिच्यावर अत्याचार केला आणि मला तुझ्यासोबत लग्न करायचा आहे, लग्न केले नाही तर तुझ्या भावाला मारून टाकेल अशी धमकी दिली.

Related Stories

No stories found.