बँकॉकच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत कुलगुरूंसह विद्यापीठातील आठ प्राध्यापकांचा सहभाग

बँकॉकच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत कुलगुरूंसह विद्यापीठातील आठ प्राध्यापकांचा सहभाग

जळगाव jalgaon प्रतिनिधी

ऑरलीकॉन बालज्सर कोटींग थायलंड कंपनी लि. (OERLICON BALJSAR COATING THAILAND COMPANY LTD.,), ग्लोबल रिसर्च अॅन्ड ट्रेनिंग फोरम व्यवस्था पुणे (Organized Global Research and Training Forum Pune ) आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (Poet Bahinabai Chaudhary North Maharashtra University) यांच्या संयुक्त विद्यमाने बँकॉक, थायलंड (Bangkok, Thailand) येथे आंतरराष्ट्रीय परिषदेचे (International Conference) आयोजन (organized) करण्यात आले आहे.  

   ही आंतरराष्ट्रीय परिषद १४ ते १७ ऑक्टोबर या कालावधीत होणार असून विद्यापीठाचे कुलगुरु प्रा.व्ही.एल.माहेश्वरी हे ऑनलाईन तर डॉ.विजय सरस्वती (कुलगुरु, एस.एम.यु. ऑस्ट्रेलिया) हे उद्घाटन सत्रात उपस्थित राहणार आहेत.

वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा.अनिल डोंगरे हे उद्घाटन व पॅनल डिक्सशन सत्रासाठी प्रत्यक्ष उपस्थित राहतील.

१६ ऑक्टोबर रोजी व्यवस्थापनशास्त्र प्रशाळेचे प्रा.समीर नारखेडे हे ऑनलाईन बीजभाषण देणार असून डॉ.रमेश सरदार व डॉ.पवित्रा पाटील हे सत्र अध्यक्ष असतील.

समारोप प्रसंगी संचालक प्रा.मधुलिका सोनवणे या असतील. प्रशाळेतील डॉ.आर.आर.चव्हाण व डॉ.अतुल बारेकर हे प्रत्यक्ष परिषदेत सहभागी होत आहेत.

या परिषदेत ऑस्ट्रेलिया, बांग्लादेश, भारत, थायलंड या देशातील प्राध्यापक, संशोधक, औद्योगिक क्षेत्रातील व्यक्ती ऑफलाईन / ऑनलाईन उपस्थित राहतील व शोधनिबंध सादर करतील अशी माहिती परीषदेचे संचालक रतीकांत रे व परिषद समन्वयक डॉ.आर.आर.चव्हाण यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com