
जळगाव jalgaon (प्रतिनिधी)
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील (Poet Bahinabai Chaudhary North Maharashtra University) आठ कर्मचारी (Staff) आज मंगळवार, दि. ३१ मे रोजी सेवानिवृत्त (Retired) झाले. त्यांना कुलगुरु प्रा.व्ही.एल.माहेश्वरी यांच्या उपस्थितीत झालेल्या समांरभात निरोप देण्यात आला.
विद्यापीठात एकाच वेळी आठ कर्मचारी निवृत्त (Retired) होण्याची ही पहिली वेळ आहे. यामध्ये उपकुलसचिव फुलचंद अग्रवाल, सहायक कुलसचिव भास्कर पाटील, सहायक कक्षाधिकारी आर.टी. बावीस्कर, लघुलेखक (उच्च श्रेणी) प्रमोद चव्हाण, वरिष्ठ सहायक सुधीर पाटील, सहायक दिलीप सोनवणे, नानाभाऊ नगराळे, वाहनचालक मधुकर वाघ यांचा समावेश आहे.
कुलगुरु प्रा.माहेश्वरी (Vice Chancellor Prof. Maheshwari) यांच्या अध्यक्षतेखाली सिनेट सभागृहात निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी मंचावर सपत्नीक सात सत्कारमूर्ती तसेच प्रभारी प्र-कुलगुरु प्रा.एस.टी.इंगळे, प्रभारी कुलसचिव प्रा.किशोर पवार, प्रभारी परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक प्रा.दीपक दलाल, प्रभारी वित्त व लेखा अधिकारी एस.आर.गोहिल यांचा समावेश होता.
यावेळी बोलतांना कुलगुरु प्रा.माहेश्वरी यांनी विद्यापीठाच्या वाटचालीत निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मोठा वाटा राहिलेला आहे. कमी होत जाणारे मनुष्यबळ (Declining manpower) हे विद्यापीठासमोर मोठे आव्हान आहे. मात्र सर्व सहकारी हे आव्हान पेलतील असा विश्वास त्यांनी बोलून दाखविला.
यावेळी अमृत दाभाडे, राजू सोनवणे, भारत उफाडे, शिवाजी पाटील, विरुदेव व्हडगर, महेश पाटील तसेच प्रभारी कुलसचिव प्रा.किशोर पवार यांनी मनोगत व्यक्त केले. सत्कारमूर्तींपैकी नाना नगराळे, सुधीर पाटील, प्रमोद चव्हाण, रवींद्र बावीस्कर आणि भास्कर पाटील यांनी सत्काराला उत्तर देतांना विद्यापीठाकडून मिळालेल्या सहकार्याचा उल्लेख केला.
यावेळी कर्मचारी संघटना,मागासवर्गीय कर्मचारी संघटना, पतपेढी तसेच विभाग आणि वैयक्तिक सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ.सुनील पाटील यांनी केले.