तांदूळाची आयशर पोलिसांच्या ताब्यात

तांदूळाची आयशर  पोलिसांच्या ताब्यात

जामनेर Jamner । प्रतिनिधी-

वरणगाव (Varangaon) येथून कत्तलीसाठी गोधन (Godhan for slaughter) घेऊन वाहन निघाल्याची माहिती गोपाल बुळे (Gopal Bule) यांना मिळाली. माहिती मिळताच बुळे यांनी पोलिस उपनिरिक्षक किशोर पाटील (Sub-Inspector Kishore Patil) यांना याबाबत माहिती देऊन बोदवड रोडवरील रामवनाजवळ बोलवले. किशोर पाटील व बुळे यांनी एम. एच.42 टी. 7474 या क्रमांकाची आयशर दिसताच अडवली. मात्र गाडीत गोधनाऐवजी तांदुळाच्या गोण्या (Sacks of rice) असल्याचे निदर्शनास आले.

या गोण्या झाकुन नेत असल्याने आलेला संशय पाहता हे वाहन जामनेर येथील पोलिस निवासस्थानातील खुल्या जागेत उभे करण्यात आले. आयशरमध्ये गुरांऐवजी तांदुळ असल्याचे निदर्शनास आल्याने हा तांदूळ रेशनचा असल्याची शंका उपस्थीत केली जात आहे. बुळे यांच्या तक्रारीवरून जामनेर पोलिस ठाण्यात रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

जामनेर पोलिसात गुन्हा दाखल

सकाळी साडेआठ वाजेदरम्यान एक आयशर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. मात्र या आयशरमुळे किरकोळ अपघात झाल्याची माहिती समोर आल्याने दुर्लक्ष केले. दरम्यान बुधवारी जामनेर पोलिस ठाण्याच्या ईन्स्पेक्षनसाठी पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे आले होते यामुळे पुढील कारवाईस वेळ झाला. रात्री बुळे यांच्या तक्रारीवरून जिवनावश्यक वस्तू साठवण व काळाबाजार प्रकरणी कलम 77 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com