धानोरा-देवगाव रस्त्यावर आयशर व मॅक्झीमोचा अपघात ; पाच गंभीर

धानोरा-देवगाव रस्त्यावर आयशर व  मॅक्झीमोचा अपघात ; पाच गंभीर

धानोरा, ता.चोपडा-वार्ताहर chopada

चोपडा (chopada) तालुक्यातील धानोरा ते देवगाव दरम्यान आयसर व मॅक्झीमो गाडी यांच्यात जोरदार धडक होऊन अपघात (accident) झाला. यात नऊ जखमी, पाच जणांची प्रकृती गंभीर आहे.

मॅक्झीमो गाडीतील सात ते आठ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. त्याच्यावर धानोरा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार केले. याबाबत सविस्तर असे की एम.एच.६३ सी.४७४७ ही आयशर चोपडाहून जळगावकडे जात असतांना धानोरा गावजवळ जितेंद्र महाजन यांच्या शेताजवळ जळगाव कडून चोपडाकडे प्रवासी घेऊन जाणारी मॅक्झीमो क्रमांक एम.एच‌.१९ बी.यु.४९७७ या गाड्यांमध्ये दुपारी साडेबाराच्या सुमारास जोरदार धडक झाली.

यात नऊ जण जखमी झाले आहेत तर पाच जण गंभीर जखमी असून त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. तर अपघातानंतर आयशर चालक व किन्नर फरार झाले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com