आयशर व ऑटोचा भीषण अपघात; धरणगाव येथील ऑटो चालकाचा मृत्यू

आयशर व ऑटोचा भीषण अपघात; धरणगाव येथील ऑटो चालकाचा मृत्यू

 मलकापूर Malkapur

नॅशनल हायवे क्रमांक सहा वर आयशर (Eicher) व ऑटोचा (auto) भीषण अपघात (accident) झाला. ही घटना 7 ऑक्टोंबर रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास रासोया नजीक घडली. यात रिक्षा चालकाचा (auto driver) वाटेतच मृत्यू (Death) झाला आहे.

   मलकापूर येथुन धरणगाव कडे जात असताना रसोया नजीक भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर क्रमांक MP 09 GG 4294 ने ऑटोला जबर धडक दिली. या धडकेमध्ये ॲटोचालक शिवाजी रामकृष्ण पाटील (वय 55 वर्ष रा.धरणगाव) हे गंभीरित्या जखमी झाले. अपघात होताच स्थानिक नागरिकांनी त्यांना उपचारार्थ जळगाव खांन्देश येथे हलवण्यात आले. परंतु त्यांची अवस्था चिंताजनक असल्याने त्यांचा वाटेतच मृत्यू झाला.

या घटनेची पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर तात्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा केला. अपघातास कारणीभूत आयशर पोलिसांनी पकडले. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विजयसिह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली मलकापूर पोलीस करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com