Photo जळगाव जिल्हा विकासात अग्रेसर राहण्यासाठी प्रयत्नशील - पालकमंत्री गुलाबराव पाटील

विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान
Photo जळगाव जिल्हा विकासात अग्रेसर राहण्यासाठी प्रयत्नशील - पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव - Jalgaon

कोरोना विषाणूला (Corona virus) जिल्ह्यातून हद्दपार करण्याबरोबरच जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करुन जिल्हा विकासाच्या बाबतीत अग्रेसर राहील, याकरीता प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील (Guardian Minister Gulabrao Patil)यांनी आज केले. भारतीय स्वातंत्र्याचा 74 वा वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या (Collector's Office) आवारात पालकमंत्री ना.पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.

यांची होती उपस्थिती

याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती रंजनाताई पाटील (Zilla Parishad President Smt. Ranjanatai Patil), महापौर जयश्री महाजन (Mayor Jayashree Mahajan), जिल्हाधिकारी अभिजीत राऊत (Collector Abhijeet Raut), जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.प्रवीण मुंढे, भारतीय प्रशासकीय सेवेतील परिविक्षाधीन अधिकारी श्रीमती नेहा भोसले, जळगाव शहर महापालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यंवशी, उपविभागीय अधिकारी प्रसाद मते, उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे, शुभांगी भारदे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिक्षक अभियंता श्रीमती गाजरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण, तहसीलदार सुरेश थोरात यांचेसह स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ नागरीक, कोरोनायोध्दे, स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी, विविध शासकीय ‍विभागांचे अधिकारी, कर्मचारी, नागरीक, माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

पोलीस महासंचालकाचे सन्मान चिन्ह

सहाय्यक फौजदार शिवाजी राजाराम पाटील, सहाय्यक फौजदार लिलाकांत पुंडलिक महाले, जिल्हा विशेष शाखा, जळगाव, पोलीस हवालदार विजय माधव काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय, जळगाव, पोलीस हवालदार शशिकांत बाबुलाल पाटील, जिल्हा विशेष शाखा, जळगाव. पोलीस हवालदार सुनिल पंडीत दामोदरे स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव, पोलीस नाईक महेश रामराव पाटील, पारोळा पोलीस स्टेशन, पोलीस नाईक संदीप श्रावण सावळे, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव

यांचा झाला सत्कार

यावेळी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी पार पाडलेल्यांचा पालकमंत्री ना. पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नेहरु युवा केंद्रातर्फे दिला जाणारा जिल्हास्तरीय उत्कृष्ट युवा मंडळ (सन 2019-2020) पुरस्कार तुळजाई बहुउद्देशीय संस्था यांना प्रदान केला.

पोलिस महासंचालकाचे विशेष सेवा पदक

पोलिस शिपाई अतुल अंगद मोरे, पोलीस मुख्यालय, जळगाव. महा आवास अभियान ग्रामीण मधील उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती -उत्कृष्ट क्लस्टर रामजीपाडा, ग्रामपंचायत, अडावद, ता.चोपडा. प्रधानमंत्री आवास योजना जिल्हास्तरीय पुरस्कार- सर्वोत्कृष्ठ तालुका- प्रथम क्रमांक मुक्ताईनगर, व्दीतीय क्रमांक भुसावळ, तृतीय क्रमांक चाळीसगाव.

राज्य पुरस्कृत योजना सर्वोत्कृष्ठ तालुका प्रथम क्रमांक मुक्ताईनगर, द्वीतीय क्रमांक एरंडोल, तृतीय क्रमांक बोदवड कृषि विभाग- किशोर संभाजीराव साळुंखे, कृषी पर्यवेक्षक, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, एरंडोल. तुफान तुकाराम खोत, कृषी सहाय्य्क, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, चाळीसगाव. श्रीमती वैशाली रंगराव पाटील, कृषी सहाय्य्क, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, भडगाव. श्री. पांडूरंग बाबुराव महाजन, कृषी पर्यवेक्षक, तालुका फळरोप वाटीका, पाचोरा, श्री तुळशीराम रामदास पवार, कृषी सहाय्य्क, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, चाळीसगाव, श्री. अमोर शिवदास पाटील, कृषी सहाय्य्क, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, जामनेर यांचा सत्कार करण्यात आला.

सुरुवातीस जळगाव पोलीस दलाच्या पथकाने पालकमंत्र्यांना मानवंदना दिली. तर बॅण्ड पथकाने राष्ट्रगीताची धून वाजविली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सरिता खाचणे आणि अपूर्वा वाणी यांनी केले. या कार्यक्रमापूर्वी भारतीय स्वातंत्र्याचा 74 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com