Photo# शिक्षणातून मनुष्याचे चरित्र घडते : राज्यपाल

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा 30 वा दीक्षांत समारंभ
Photo# शिक्षणातून मनुष्याचे चरित्र घडते : राज्यपाल

जळगाव jalgaon

शिक्षणातून (education) मनुष्याचे चरित्र घडत (Character happens) असते. पुर्वीच्या शिक्षणातून विद्यार्थ्यांना (students) यंत्र बनविले गेले. आताच्या नवीन शैक्षणिक धोरणात उत्तम नागरिक घडविला जाणार आहे. देश नव्या युगात प्रवेश करण्यासाठी सज्ज झाला असून पदवीधर (Graduate) झालेली ही नवी पिढी मोठे योगदान देईल अशी अपेक्षा व्यक्त करत विद्यार्थ्यांनी कायम ‘मी करु शकतो/शकते’ ही भावना अंगी बाळगावी असा सल्ला महाराष्ट्राचे राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी (Governor and Chancellor Bhagat Singh Koshyari) यांनी दिला.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा (Poet Bahinabai Chaudhary North Maharashtra University) तिसावा दीक्षांत समारंभ (Thirty Convocation Ceremony) मंगळवार, दि.24 मे रोजी पार पडला. यावेळी कुलपती तथा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor and Chancellor Bhagat Singh Koshyari) यांची कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ऑनलाईन उपस्थिती होती. त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदेच्या (National Assessment and Accreditation Council) कार्यकारी समितीचे अध्यक्ष प्रा.भूषण पटवर्धन (Prof. Bhushan Patwardhan) यांनी दुरदृश्य प्रणालीद्वारे दीक्षांत भाषण केले.

पुढे बोलतांना कुलपती तथा राज्यपाल कोश्यारी म्हणाले की, सुवर्णपदकांमध्ये विद्यार्थिंनींचे प्रमाण अधिक आहे या बद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. बहिणाबाई चौधरी(Bahinabai Chaudhary) या अशिक्षीत असतांनाही त्यांनी उत्तम प्रकारच्या कविता केल्या. अरे संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर तवा मियते भाकर या कवितेचा उल्लेख करून श्री कोश्यारी यांनी आपल्या जीवनातून लोकांना प्रेरणा मिळावी अशा प्रकारचे काम केले जावे अशी अपेक्षा बोलून दाखविली. त्यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वाटचालीचे कौतूक केले. ग्रामीण भागात (rural areas) अधिक गुणवत्ता (Quality) असल्याचे ते म्हणाले.

प्रमुख अतिथी म्हणून बोलतांना राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदेच्या (National Assessment and Accreditation Council) कार्यकारी समितीचे अध्यक्ष प्रा.भूषण पटवर्धन (Prof. Bhushan Patwardhan) यांनी नव्या औद्योगिक क्रांतीत तंत्रज्ञानाचा परिणाम होऊन पारंपरिक नोकर्‍यांचा ताबा नव्या यंत्रसामुग्रीने घेतल्यामुळे पुढील पंधरा ते तीस वर्षात 40 टक्क्यांपेक्षा जास्त नोकर्‍या गमावण्याची भिती आहे. मात्र नवीन नोकर्‍या देखील भरपुर निर्माण होण्याची शक्यता दिसत असतांना या नोकर्‍यात भिन्न प्रकारची कौशल्ये गरजेची ठरणार आहेत. ते कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्याच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी विद्यापीठांनी सज्ज होण्याची गरज असल्याचे सांगितले.

प्रा.पटवर्धन म्हणाले की, डॉ.कस्तुरीरंगन यांच्या नेतृत्वाखालील नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दुरदर्शी असून विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (University Grants Commission) शैक्षणिक गुणवत्ता सुधारणेला बळ देणारे आहे. प्रबोधन आणि सशक्तीकरण (Awareness and empowerment) हे शिक्षणाचे उद्दिष्ट असून विचारशील आणि संवेदनशील नागरिक त्यातून तयार होऊ शकतो. शिक्षणाचा मुख्य उद्देश सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, व्यावसायिक आणि बौद्धिक विकास असा हवा. ज्यामुळे विद्यार्थी उत्तम नागरिक घडतील आणि उपजिविका प्राप्त करण्यासाठी तयार होतील. सद्याची पारंपरिक विद्यापीठे वर्गशिक्षणावर भर देत आहेत.

आजचे विद्यार्थी मात्र व्यावहारिक ज्ञान आणि कौशल्य मिळविण्यासाठी नाविण्यपूर्ण मार्ग शोधत आहेत. राष्ट्रीय सेवा योजना आणि राष्ट्रीय छात्र सेना यांच्या उपक्रमांमध्ये बदलाची गरज असून रासेयोसाठी शेती, उद्योग, व्यवसाय आणि सामुदायिक संस्थामध्ये काम करण्यासाठी एक सत्र तसेच राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांसाठी संरक्षण, सुरक्षा, पोलीस आदींमध्ये एक सत्र (सेमिस्टर) घालवता यायला हवे. असे सांगतांना डॉ.पटवर्धन यांनी सर्व विद्यापीठांनी एका सेमिस्टरसाठी विद्यार्थ्यांची परस्पर देवाण-घेवाण (Mutual exchange of students) करायला हवी अशी अपेक्षा बोलून दाखवली. पर्यावरण, हवामान, वाढती विषमता, डिजीटल विभाजन आणि संपत्तीचे असमान वितरण यामुळे नकारात्मक चिंता वाढीस लागली आहे.

भविष्यातील शिक्षणात याबाबतही काही उपाय सुचविण्याची गरज आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, सामाजिक विज्ञान, समकालीन कला आणि मानवता या क्षेत्रातील प्रगती एकत्रित करून आपल्या सांस्कृतिक वारशाच्या पायावर आपली विद्यापीठे उभी करणे आवश्यक आहेत. असे सांगतांना प्रा.पटवर्धन यांनी विद्यापीठीय शिक्षणात कृषी, पर्यावरण आणि आरोग्याचा समावेश व्हावा, तंत्रज्ञानाच्या नवकल्पना स्वीकाराव्यात, मूल्यप्रणाली, संस्कृती आणि स्थानिक भाषांचा आदर करावा अशी अपेक्षा व्यक्त केली.

विद्यापीठातील राजकिय हस्तक्षेप बंद होण्यासह पदे प्रभारी राहू नयेत

पुढे बोलतांना प्रा. पटवर्धन म्हणाले की, शिक्षकांनी मार्गदर्शक म्हणून कार्य करावे. रोबोटच्या युगातही मानवी शिक्षक अपरिहार्य आहे. त्यामुळे ज्ञान आणि कौशल्या सोबत माणूस बनने हा आजच्या शिक्षणाचा इच्छित परिणाम असायला हवा. असे सांगतांना प्रा.पटवर्धन यांनी विद्यापीठांमधील राजकीय हस्तक्षेप(Political interference) बंद व्हावा तसेच महत्वाची पदे प्रभारी राहू नयेत असे मत बोलून व्यक्त केले. त्यांनी बहिणाबाई चौधरी यांच्या ‘मानसा मानसा कधी व्हशीन मानूस’ या कवितेने दीक्षांत भाषणचा समारोप केला. आपल्या भाषणात त्यांनी कबचौउमविच्या विविध योजनांचा गौरव केला आणि माजी कुलगुरुंच्या योगदानाचाही उल्लेख केला.

कुलगुरू प्रा.व्ही.एल.माहेश्वरी यांनी विद्यापीठाचा विकास आढावा सादर केला. तसेच भविष्यकालीन योजनांचाही संकल्प बोलून दाखविला. त्यामध्ये कौशल्य विकसन केंद्र तसेच उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे म्हणून दोन नाविण्यपूर्ण प्रकल्प सुरू करणार असल्याची माहिती प्रा.माहेश्वरी यांनी दिली.

या कार्यक्रमात दीक्षांत मिरवणूकीने (Convocation procession) सभागृहात कुलगुरु, अधिष्ठातांचे आणि प्राधिकरणाच्या सदस्यांचे आगमन झाले. विद्यापीठाचा मानदंड घेऊन सहायक कुलसचिव भास्कर पाटील मिरवणूकीच्या अग्रभागी होते. दीक्षांत मिरवणूकीत कुलगुरू, प्रभारी प्र-कुलगुरु, प्रभारी कुलसचिव, प्रभारी संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ व चार अधिष्ठाते तसेच अधिसभा, विद्या परिषद आणि व्यवस्थापन परिषदेचे सदस्य सहभागी होते. प्रारंभी राष्ट्रगीत व विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

त्यानंतर प्रभारी कुलसचिव प्रा. किशोर पवार यांनी कुलपतींकडे कार्यक्रम सुरु करण्याची परवानगी मागितली. विविध विद्याशाखांच्या अधिष्ठातांनी स्नातकांना पदवी प्रदान करण्यास्तव केलेल्या विनंतीनुसार स्नातकांना पदवी प्रदान (Graduates awarded degrees) केल्या. कुलपती श्री भगत सिंह कोश्यारी यांनी उपदेश केला. अधिष्ठातांमध्ये, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता, प्राचार्य आर.एस.पाटील, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता, प्राचार्य पी.पी.छाजेड, मानव्य विद्या विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता, प्राचार्य डॉ.पी.एम.पवार, आणि आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता, प्राचार्य डॉ. ए.आर.राणे यांचा समावेश होता. यावेळी मंचावर व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील, प्राचार्य आर.एस.पाटील, प्राचार्य पी.पी.छाजेड, प्राचार्य एल.पी.देशमुख, प्राचार्य आर.पी.फालक, प्रा.मोहन पावरा, डॉ.महेश घुगरी, दीपक पाटील, विवेक लोहार, प्रा.जे.बी.नाईक, डॉ.सौ.प्रिती अग्रवाल, डी.पी.नाथे, संतोष चव्हाण, एस.आर.गोहिल, प्रा.डी.एस.दलाल उपस्थित होते.

या कार्यक्रमानंतर कुलगुरू प्रा.माहेश्वरी (Vice Chancellor Prof. Maheshwari) यांच्या हस्ते सुवर्णपदके वितरीत करण्यात आली. पालकांसह सुवर्णपदक प्राप्त विद्यार्थी मंचावर पदक घेण्यासाठी उपस्थित होते.सुवर्ण पदक प्राप्त 98 विद्यार्थ्यांची नावे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक प्रा.दीपक श.दलाल यांनी घोषीत केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आशुतोष पाटील व प्रा.सुरेखा पालवे यांनी केले. या समारंभाला व्यवस्थान परिषद सदस्य, अधिसभा सदस्य व विद्यापरिषद सदस्य उपस्थित होते.

या दीक्षांत समारंभात (Convocation Ceremony) 20 हजार 75 स्नातकांना पदव्या बहाल करण्यात आल्या. यामध्ये विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे 9 हजार 322 स्नातक, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे 5 हजार 762 स्नातक, मानव्य विज्ञान विद्याशाखेचे 4 हजार 508 आणि आंतर विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेचे 480 स्नातकांचा समावेश असुन त्यामध्ये 214 पीएच.डी. धारक विद्यार्थी आहेत.

या शिवाय स्वायत्त असलेल्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे 404, मुळजी जेठा महाविद्यालयाचे 469, प्रताप महाविद्यालयाचे 384 आणि जी.एच.रायसोनी इन्स्टीट्युट ऑफ बिझीनेस मॅनेजमेंटचे 402 अशा एकूण 1 हजार 695 विद्यार्थ्यांना देखील पदवी बहाल करण्यात आल्या.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com