शिक्षणमंत्री 26 रोजी विद्यापीठात साधणार संवाद : निवेदने पाठविण्याचे आवाहन

कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ
कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ

जळगाव jalgaon प्रतिनिधी

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री (Education Minister) उदय सामंत (Uday Samant) शनिवार २६ फेब्रुवारी रोजी जळगाव दौऱ्यावर येणार आहेत. सकाळी ११ वाजता कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ‘उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय आपल्या विभागात’ या अभिनयांतर्गत उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय@ कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, (Poet Bahinabai Chaudhary North Maharashtra University,) जळगाव या उपक्रमात उच्च व तंत्र शिक्षण क्षेत्राशी संबंधित घटकांच्या अडीअडचणी ऐकून घेऊन त्या सोडविणार आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत उच्च व तंत्र शिक्षण (Higher and Technical Education) मंत्रालय (Ministry)@ कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव हा कार्यक्रम दि.२६/०२/२०२२ रोजी विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री (Education Minister) ना. उदय सामंत, उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयातील व संचालक, उच्च व तंत्र ‍ शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांसमवेत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात प्रत्यक्ष उपस्थित राहून विद्यार्थी, पालक, शिक्षक, प्राचार्य, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यापीठीय कर्मचारी, शैक्षणिक संस्था आदी विविध घटकांच्या अडीअडचणी ऐकून घेऊन त्या सोडविणार आहेत.

त्या अनुषंगाने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने सर्व संबंधित घटकांच्या सोयीसाठी विद्यापीठाच्या www.nmu.ac.inया वेबसाईटच्या मुख्य पृष्ठावर उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय@ कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव(Poet Bahinabai Chaudhary North Maharashtra University,) ही विशेष लिंक निर्माण केली आहे.

येथे इंग्रजी अथवा मराठीतून आपले प्रश्न मांडता (Asking questions) येणार आहेत. ऑनलाईन निवेदनात (Statement) आवश्यक कागदपत्रे जोडण्याची व्यवस्था उपलब्ध आहे. त्यानुसार उच्च व तंत्र शिक्षण क्षेत्राशी संबंधित सर्व घटकांनी आपली निवेदने २२ फेब्रुवारी २०२२ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ऑनलाईन सादर करण्यास आवाहन करण्यात येत आहे. ऑनलाईन निवेदन सादर केले आहे त्यांनी आणि ज्यांना ऑनलाईन पध्दतीने निवेदन सादर करणे शक्य होणार नाही, त्यांनी कार्यक्रमाच्या वेळी पूर्वनोंदणी करून टोकन घेऊन आपले निवेदन प्रत्यक्ष मंत्री महोदयांना सादर करावे. अशी माहिती विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव प्रा.रा.ल. शिंदे (Registrar R.L. Shinde) यांनी दिली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com