
जळगाव | Jalgaon
आज सकाळी जिल्ह्यातील भुसावळ (Bhusawal) परिसरात भुकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत. या भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले...
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ व सावदा परिसरात सकाळी 10 वाजून 35 मिनिटांच्या सुमारास भुकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते. रेक्टर स्केलवर ३.३ ऐवढी तिव्रता नोंदली गेली आहे.
गडकरीनगर ग्रीन पार्क, विठ्ठलमंदिर वार्ड, शनि मंदिर वार्ड, वांजोळा रोड, बाजारपेठ परिसरातदेखील दीड सेकंदाचे भुकंपाचे धक्के बसल्याचे समजते.
नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यक ती काळजी घ्यावी. असे आवाहन अमन मित्तल, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, जळगाव यांनी केले आहेत.