रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे परत मिळाले तीन लाखांचे सोने

नजरचुकीने विसरुन गेले होते बॅग; पोलिसांचे सर्वत्र कौतुक
रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे परत मिळाले तीन लाखांचे सोने

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

शहरातील रेल्वे स्थानकावर (railway station) आव्हाणे येथील दाम्पत्याच्या दोन बॅगा राहून गेल्या होत्या. या बॅगेत कपड्यांसह साडेतीन लाखांचे सोने (Three and a half lakhs worth of gold) व इतर ऐवज होता. दरम्यान, रेल्वे पोलिसांनी (railway police) त्या प्रवाशांचा शोध (Search for passengers) घेवून त्यांना त्यांच्या बॅगा त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्याने त्या पोलिस कर्मचार्‍यांचे सर्वत्र कौतूक होत आहे.

जळगाव तालुक्यातील आव्हाणे येथील सुनील पुंडलिक चौधरी व त्याची पत्नी अंकिता सुनील चौधरी हे त्याच्या नातेवाईकांसह पालघर येथे वास्तूशांतीच्या कार्यकमाला जाण्यासाठी गुरुवारी सायंकाळी 6 वाजता रेल्वे स्थानकावरुन आल्या. जळगाहून त्या भुसावळ बांद्रा एक्सप्रेसने ते प्रवास करण्यासाठी बसले. याचवेळी त्यांची 15 ग्रॅम मंगळसूत्र, 19 ग्रॅमची एक सोन्याची चैन असे साडेतीन लाखांचे दागिणे व कपडे तसेच इतर साहित्य असलेल्या दोन बॅग जळगाव रेल्वेस्थानकावर राहून गेल्या. रेल्वे गाडीत काही अंतर प्रवास केल्यानंतर सुनील चौधरी यांना बॅग रेल्वेस्थानकावर विसरल्याचे लक्षात आले. त्यांनी तत्काळ त्यांचे जळगाव शहरातील साडू ज्ञानेश्वर पाटील यांना माहिती दिली.

रेल्वे पोलिसांना दिली माहिती

ज्ञानेश्वर पाटील यांनी जळगाव रेल्वे स्टेशन गाठले व रेल्वे पोलीसांना घटना कथन केली. त्यानुसार रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल रामराव इंगळे व पोलीस शिपाई किशोर पाटील यांनी तत्काळ रेल्वे स्थानक परिसरात बॅगचा शोध घेत बॅग सुखरुप परत मिळवून दिल्या.

पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक

ज्ञानेश्वर पाटील यांच्या तक्रारीची तत्काळ दखल घेत दोन्ही बॅग सुखरुप परत मिळाल्याने ज्ञानेश्वर पाटील रेल्वे पोलिसांचे आभार मानले आहे. तसेच पोलिसांच्या तत्परतेचे कौतुकही केले आहे. पोलिसात जबाब नोंदवून घेत दोन्ही बॅग ज्ञानेश्वर पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com