
जळगाव jalgaon । प्रतिनिधी
अमृत योजनेचे काम (Working of Amrit Yojana) गेल्या सहा वर्षापासून जळगाव शहरात सुरू आहे. त्यात तीन ठिकाणी रेल्वे रुळाच्या (railway tracks) खालून पाईपलाईन (Pipeline) टाकण्यासाठी रेल्वे प्रशासनाची (Railway Administration) परवानगी (Permission)आवश्यक असल्यामुळे महानगरपालिकेने रेल्वेला तीन कोटी रुपयांची रक्कम (amount) त्यांच्या खात्यात वर्ग केली. परंतु ही रक्कम रेल्वेच्या खात्यात जमा न झाल्यामुळे गेल्या तीन महिन्यापासून अमृत योजनेच्या कामाला तीन महिन्यापासून (stalled work) थांबलेले आहे.
जळगाव शहरात गेल्या सहा वर्षांपासून अमृत योजनेचे काम सुरु आहे. विविध कारणांमुळे ही योजना सहा वर्षांपासून कासव गतीने सुरू आहे. अमृतच्या कामामध्ये एक मोठा अडथळा निर्माण झाला असून अमृत योजनेअंतर्गंत सुरु असलेल्या जलवाहिनी व मलनिस्सारण लाईनचे काम 3 महिन्यापासून रखडले आहे. रेल्वे रुळा खालून जलवाहिनी व भूमिगत गटार टाकण्यासाठी रेल्वेची परवानगी आवश्यक होती.
ही परवानगी मिळावी याकरीता महापालिकेने रेल्वे प्रशासनाला 3 कोटी रुपये वर्ग केले परंतु रेल्वेच्या बँक खात्यात ती रक्कम जमा न झाल्यामुळे रेल्वेकडून महापालिकेला परवानगी मिळालेली नाही. महापालिकेकडून रेल्वेच्या बँक खात्यात पैसे जमा झाल्याशिवाय रेल्वे प्रशासनाकडून पाईपलाईन टाकण्याची परवानगी दिली जाणार नाही.
जलवाहिनीचे 832 किमीचे काम पुर्ण
जळगाव शहरात अमृत योजनेअंतर्गंत 855 किलो मीटर जलवाहिनी टाकण्यात येणार होती. परंतु 6 वर्ष झाले तरी देखील जलवाहिनीचे काम अपुर्णच आहे. 855 किलो मीटरपैकी 832 किमीचे काम पुर्ण झाले असून 23 किमीचे काम अपुर्ण आहे. तसेच भूमिगट गटारींचे 204 किमी पैकी 202 किमीचे काम पुर्ण झाले असून 2 किमीचे काम अपुर्ण आहे.