विद्यापीठातील कर्मचार्‍यांच्या लेखणीबंद आंदोलनामुळे डॉ. भादलीकर यांचा राजीनामा

कृती समितीच्या आंदोलनाला यश, प्रभारी कुलसचिवपदी प्रा.डॉ. आर.एल. शिंदे
विद्यापीठातील कर्मचार्‍यांच्या लेखणीबंद आंदोलनामुळे डॉ. भादलीकर यांचा राजीनामा

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे (Poet Bahinabai Chaudhary North Maharashtra University) प्रभारी कुलसचिव म्हणून, डॉ. एस.आर. भादलीकर (registrar Dr. S.R. Bhadalikar) यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, त्यांच्या नियुक्तीला विरोध करत, विद्यापीठातील कृती समितीच्यावतीने (University Action Committee) कर्मचार्‍यांनी लेखणीबंद आंदोलन केले. जोपर्यंत राजीनामा घेणार नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा कृती समितीने दिला होता. त्यामुळे डॉ.भादलीकर यांनी राजीनामा (resigns) दिला असून, त्यांच्या जागी प्रभारी कुलसचिव म्हणून, प्रा.आर.एल.शिंदे (Registrar in charge, Prof. R. L. Shinde) यांच्याकडे पदभार सोपविण्यात आला आहे.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव म्हणून विद्यापीठातील संख्याशास्त्र विभागप्रमुख प्रा. आर.एल. शिंदे यांनी आज गुरूवार दि. 14 ऑक्टोबर रोजी पदभार स्वीकारला. सध्याचे प्रभारी कुलसचिव डॉ. एस.आर. भादलीकर यांनी प्रभारी कुलसचिव पदाचा राजीनामा गेल्या आठवड्यात दिला.

हा राजीनामा प्रभारी कुलगुरू प्रा. ई. वायूनंदन यांनी स्वीकारला व प्रा. आर.एल. शिंदे यांची प्रभारी कुलसचिव म्हणून कुलगुरूंनी नियुक्ती केली. डॉ. शिंदे यांनी पदभार घेतला त्यावेळी प्रभारी प्र. कुलगुरू प्रा. बी.व्ही. पवार, प्रभारी वित्त व लेखाधिकारी प्रा. मधुलिका सोनवणे, प्रभारी परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक प्रा. के.एफ. पवार, डॉ. एस.आर. भादलीकर, सहायक कुलसचिव व्ही.व्ही. तळेले आदी उपस्थित होते.

डॉ. आर.एल. शिंदे हे विद्यापीठाच्या गणितशास्त्र प्रशाळेत संख्याशास्त्र विभागप्रमुख म्हणून कार्यरत असून यापुर्वी या प्रशाळेचे संचालक म्हणून त्यांनी काम केलेले आहे. 28 वर्षाचा त्यांना अध्यापनाचा अनुभव असून विविध प्राधिकरणे व समित्यांवर त्यांनी काम केलेले आहे.

सहा विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. पूर्ण केली आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांचे शोध निबंध प्रकाशित झालेले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com