बंडखोरांच्या दबावतंत्रामुळे मनपात भूकंपाची नांदी

महापौर, उपमहापौरांवर नाराजी वाढली; काही नगरसेवक नगरविकास मंत्र्यांच्या भेटीला
बंडखोरांच्या दबावतंत्रामुळे मनपात भूकंपाची नांदी
Jalgaon Municipal Corporation

डॉ.गोपी सोरडे । जळगाव jalgaon

भाजपच्या बंडखोर नगरसेवकांनी (Rebel BJP corporators) करेक्ट कार्यक्रम लावल्यामुळे जळगाव महानगरपालिकेत (Jalgaon Municipal Corporation) बहुमतात असलेली सत्ता भाजपला (BJP) गमवावी लागली. आता, पुन्हा हाच कित्ता गिरविण्यात येत असून, बंडखोर नगरसेवकांच्या दबावतंत्रामुळे महापालिकेत पुन्हा एकदा राजकीय भूकंप (Political earthquake) होण्याची शक्यता आहे. दरम्यान, विद्यमान महापौर, उपमहापौरांवर नाराज असलेले काही बंडखोर नगरसेवक मुंबईला जाणार असल्याचे विश्वसनिय वृत्त आहे.

जळगाव महानगरपालिकेच्या 2019 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत (general election) जळगावकरांनी भाजपला (BJP) कौल देवून स्पष्ट बहुमतानी 57 जागा निवडून दिल्या. मात्र, अंतर्गत गटबाजीमुळे 27 भाजपच्या नगरसेवकांनी बंडखोरी (Rebellion of corporators) करत, शिवसेनेशी (Shiv Sena) हातमिळवणी केली. त्यामुळे स्पष्ट बहुमतात असलेल्या भाजपला सत्ता राखण्यास अपयश आले. दरम्यान, बंडखोर नगरसेवकांच्या पाठींब्यावर शिवसेनेला सत्ता काबीज करण्यास यश आले. 18 मार्च 2021 रोजी झालेल्या महापौर-उपमहापौर निवडणुकीत शिवसेनेच्या नगरसेविका जयश्री महाजन यांची महापौरपदी तर बंडखोर नगरसेवक कुलभूषण पाटील यांची उपमहापौर म्हणून वर्णी लागली. मात्र, वर्षभरातच शिवसेना आणि बंडखेर नगरसेवकांमधील गटबाजी वाढल्याने महानगरपालिकेतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर

बंडखोर नगरसेवकांच्या पाठींब्यावर शिवसेनेने भाजपला धक्का देवून महापालिकेवर भगवा फडकवला. मात्र, वर्षभरातच बंडखोर व शिवसेना (Rebels and Shiv Sena) नगरसेवकांच्या (corporators) अंतर्गत कलहामुळे (Internal strife) गटबाजी उघड होवून चव्हाट्यावर आली आहे. बंडखोर नगरसेवक हे केवळ दबाव तंत्राचाच (pressure system itself) वापर करत असल्याचेही बोलले जात आहे.

बंडखोर नगरसेवक आज मुंबईत

नाशिक येथे विभागीय आयुक्तांकडे (Divisional Commissioners) होणार्‍या सुनावणीसाठी (hearing) उद्या दि. 10 रोजी बंडखोर नगरसेवक हजर राहणार आहेत. सुनावणी झाल्यानंतर काही बंडखोर नगरसेवक मुंबईला जाणार असून, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून महापालिकेच्या कारभाराविषयी ते चर्चा करणार आहेत. बंडखोर नगरसेवकांसोबत शिवसेनेचेही काही नगरसेवक सोबत जाणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

का, वाढली नाराजी?

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे. अर्थात ठाकरे सरकार असल्यामुळे आणि जळगाव महापालिकेत शिवसेनेने सत्ता काबीज केल्यामुळे विकास कामांना निधी मिळेल, प्रभागातील विकासकामे होतील अशी अपेक्षा बंडखोर नगरसेवकांना होती. मात्र, केवळ महापौर आणि उपमहापौरांच्या प्रभागातच विकासकामे होत असल्याने बंडखोर नगरसेवकांमध्ये कमालीची नाराजी वाढली तसेच शिवसेनेचेही काही नगरसेवक पदाधिकार्‍यांवर नाराज असल्याची चर्चा आहे.

Related Stories

No stories found.