
चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी
शहरातील भरवस्तीत काल दिनेश ऊर्फ भावडू वाल्मिक जाधव या तरुणाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला रात्री उशिरा गुुन्हां दाखल करण्यात आला असून चार ते पाच जणांना अटक करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. खून हा पूर्व वैमन्यासतून व पूर्व नियोजित झाला हे सिद्ध झाले असून यात माजी नगरसेवकांच्या मुलांचा हात आहे. गेल्या काही दिवासांपासून चाळीसगावात गैगवार उफाळून आले असून चाळीसगावच्या शांततेला गालबोट लागले आहे. कालच्या घटनेमुळे शहरातील वातावरण तंग झाले आहे. चाळीसगाव पोलीस स्टेशनला रुजू झाल्यापासून खमक्या आधिकारी म्हणून ओळख निर्माण केलेल्या पो.नि.के.के.पाटील यांच्या कार्यपध्दतीवर अनेक प्रश्न निर्माण झाले असून शहराच्या शांततेसाठी नवीन दमाचा आधिकारी नेमण्याची मागणी होवू लागली आहे.
चाळीसगाव शहारतील पोदार शाळेजवळ दि,१५ रोजी ६.४० वाजेच्या सुमारास मयत दिनेश ऊर्फ भावडु वाल्मिक जधाव(२८) हा त्याचा मित्र निखील राजपुत यांच्या सोबत गप्पा मारत असताना, अंकित महेंद्र मोरे, संकेत महेंद्र मोरे, अनिकेत महेंद्र मोरे, मुकेश उर्फ भुर्या मोरे सर्व रा.हनुमानवाडी, रोहीत उर्फ पावट्या अशोक गवळी, रा. शिवाजी चौक, हर्षल दिपक राठोड रा.जुना मालेगाव रोड, शाम उर्फ भोला पूर्ण नाव माहित नाही व इतर पाच अनोळखी इसम आदि सर्व जण बुलेट व मोटार सायंकलवर त्याठिकाणी आले व ‘ दिनेश हा सुमित भोसले सोबत राहतो, हा पण जास्त मातला आहे, याचा काटा काढवा लागेल ’ अशी धमकी देवून सर्वांनी शिवीगाळ करुन, दोन ते तीन जणांनी त्यांच्या हातातील चाकूने मयताच्या गळ्याच्या खाली, छातीवर व पोटावर भोकसून, गंभीर जखमी केले. तसेच इतरांना लाथाबुक्यांनी व लाकडी दांड्यांनी मारहाण करुन, त्यांचा खून केला. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला वरील सर्वांनाविरोधात वाल्मीक रामचंद्र जाधव यांच्या फिर्यादीवरुन भादवी कलम ३०२,३२३,३२४,५०४,५०६,१४३,१४४,१४७,१४८,१४९ प्रमाणे गुन्हां दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि सागर ढिकले हे करीत आहेत. आज दि,१६ रोजी मयत दिनेश जाधव यांच्यावर पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्काराच्यावेळी अनेकांनी भाषणबाजी केली व दिनेश जाधव यांच्या खूनामागे अनेक बड्या अस्तीचा हात असून त्यांच्यावर देखील गुन्हां दाखल करण्याची मागणी हाेत आहे.