
लालचंद अहिरे । जळगाव jalgaon
जळगाव तालुक्यात नव्या प्रभाग रचनेमुळे (new ward structure) पाच गट आणि 10 गण राहणार असून काही ठिकाणी गट-गणातील गाव तुटली असल्याने या प्रभागातील राजकीय समीकरण (Political equations) बदलाची नांदी ठरणार आहे. यापूर्वी भाजप-2, राष्ट्रवादी काँग्रेस-2 आणि शिवसेना-1 अशी स्थिती होती. मात्र, नव्या प्रभाग रचनेचा फायदा कोणत्या राजकीय पक्षाला (political party) होणार याविषयी राजकीय तज्ज्ञाकडून गणित मांडले जात आहे. असे असले तरी जळगाव तालुक्यातील गट आणि गणात भाजपासमोर (bjp) राष्ट्रवादी काँग्रेस, (NCP) शिवसेनेचे ( Shiv Sena) कडवे आव्हान कायम राहणार आहे.
यापूर्वी कानळदा-भोकर गटातून भाजपचे प्रभाकर गोटू सोनवणे,आसोदा-ममुराबाद गटातून राष्ट्रवादीच्या पल्लवी जितेंद्र पाटील तर नशिराबाद-भादली गटातून भाजपचे लालचंद प्रभाकर पाटील, शिरसोली प्र.बो.गटातून धनुबाई वसंत आंबटकर तर म्हसावद-बोरनार गटातून शिवसेनेचे पवन भिलाभाऊ सोनवणे यांनी प्रतिनिधीत्व केलेले आहे
. आता नव्या प्रभाग रचनेमुळे कानळदा-भोकर, आसोदा-ममुराबाद, कुसुंबा-भादली, शिरसोली-चिंचोली,म्हसावद-बोरनार अशी गटाची रचना झालेली असून या गट आणि गणातील काही गावे तुटलेली आहे. तर काही गावे दुसर्या गट व गणाला समाविष्ट झालेली आहे. या प्रभाग रचनेचा बदलाचा कोणत्या राजकीय पक्षाला पूरक ठरणार आणि कोणत्या पक्षाला मारक ठरणार याविषयी येणारा काळच ठरवेल.
यापूर्वी जळगाव तालुका हा भाजपाचा बाल्लेकिल्ला राहिलेला आहे. मात्र, आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य वाढत असल्याने भाजपासमोर आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीत कस लागणार आहे. तसेच सध्या राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस महाविकास आघाडी असल्याने जळगाव तालुक्यात भाजपाला मोठे आव्हान पेलावे लागणार आहे.
पालकमंत्र्यांसह आमदारांचे वर्चस्व
जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे हे भाजपाचे तर जळगाव ग्रामीण मतदार संघातून पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील हे शिवसेनेचे प्रतिनिधीत्व करीत आहे. जळगाव बाजार समितीवर शिवसेनेचे वर्चस्व आहे. तर जळगाव पंचायत समितीवर शिवसेनेची सत्ता होती. जिल्हा परिषदेमध्ये शिवसेना व राष्ट्रवादीचे बर्यापैकी प्राबल्य आहे. आता नव्या प्रभाग रचनेमुळे नशिराबाद-भादली गटाऐवजी कुसुंबा-भादली गट उदयास आला आहे. त्यामुळे या गट आणि गणातील गावे तुटली आहेत. त्यात पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी नशिराबाद सह इतर गावात विकास कामांच्या माध्यमातून जनसंपर्क वाढविला आहे.त्यामुळे शिवसेनला या प्रभागात पूरक वातावरण निर्मिती झालेली आहे. तर या गटात भाजपच्या उमेदवाराचा मात्र कस लागणार आहे.
दहा गणात 86 गावांचा समावेश
भोकर गणात भोकर, गाढोदे, आमोदे बु.,पळसोद, जामोद, भादली खुर्द, कठोरा, किनोद, सावखेडा खुर्द, फुपणी, देवगाव,पिलखेडा, नंदगाव, फेसर्डी, करंज, धानोरे खुर्द, तर कानळदा गणात कानळदा, घार्डी, आमोदे खुर्द, नांद्रा बु.,डिक्साई, रिधूर, कुवारखेडे, खेडी खुर्द, वडनगरी, फुपनगरी या गावांचा सामावेश आहे. ममुराबाद गणात ममुराबाद, आव्हाणे, आवार, धामणगाव, विदगाव, तुरखेडा, नांद्राखुर्द, खापरखेडा, तर आसोदा गणात आसोदा, तरसोद,देऊळवाडे, सुजदे, तर भादली गणात भादली बु.भोलाणे, शेळगाव, कानसवाडे,कडगाव, दिघ्रे, खिर्डी, बेळी, तर कुसुंबे खुर्द गणात कुसुंबे खुर्द, मोहाडी, सावखेडा बु., मन्यारखेडा, निमगाव बु. भागपूर, तर शिरसोली प्र.न.गणात शिरसोली प्र.न. शिरसोली प्र.बो. रामदेववाडी, धानवड गणात धानवड, चिंचोली, उमाळे, देव्हारी, पिंपळे, कंडारी, रायपूर वसंतवाडी, म्हसावद गणात म्हसावद, लमांजन प्र.बो. कुर्हाडदे, वाकडी, दापोरे, धानोरे बु.,नागझिरी, बिलवाडी, वावडदे, बिलखेडा तर बोरनार गणात बोरनार, विटनेर, सुभाषवाडी, वराड बु. वराड खुर्द, पाथरी, डोमगाव, वडली, जळके, जवखेडे, लोणवाडी खुर्द, लोणवाडी बु., या गावांचा समावेश आहे.
आमदार राजूमामा भोळेंची प्रतिष्ठा पणाला लागणार
राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी,काँग्रेस महाविकास आघाडी असल्याने तिन्ही राजकीय पक्ष एकत्रित मोट बांधणी करुन लढले तर भाजपाला या प्रभागात मोठे आव्हान उभे राहणार आहे. जळगाव तालुक्यातील काही गावे ग्रामीण मतदार संघात आहे. तर जळगाव शहराचे नेतृत्व आमदार राजूमामा भोळे करीत आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील व आमदार राजूमामा भोळे यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.
भोकर गणात सर्वाधिक 16 गावांचा समोवश
जळगाव तालुक्यातील भोकर गणात सर्वाधिक 16 गावे तर शिरसोली प्र.न गणात 3 गावांचा समोवश आहे. बोरनार गणात 13 गावे तर कानळदा,म्हसावद गणात प्रत्येकी 10 गावांचा समावेश करण्यात आला आहे. ममुराबाद, भादली,धानवड गणात प्रत्येकी 8 गावांचा समावेश आहे. कुसुंबे खुर्द गणात 6 तर आसोदा गणात 4 गावांचा समावेश करण्यात आलेला आहे.